जिल्ह्याला ५० कोटींचा आमदार निधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

पुणे - दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी जिल्हा नियोजन (डीपीडीसी) समितीअंतर्गत मिळणारा आमदार निधी पुणे जिल्ह्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकूण २५ आमदारांकडून जिल्ह्यासाठी विकासकामांसाठी सुमारे ५० कोटींचा निधी मिळणार आहे. 

पुणे - दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी जिल्हा नियोजन (डीपीडीसी) समितीअंतर्गत मिळणारा आमदार निधी पुणे जिल्ह्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकूण २५ आमदारांकडून जिल्ह्यासाठी विकासकामांसाठी सुमारे ५० कोटींचा निधी मिळणार आहे. 

जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बारामती लोकसभा मतदारासंघातून खासदारकीची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी जानकर यांची भाजपकडून विधान परिषदेवर निवड झाली होती. त्या वेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीचा निधी सातारा जिल्ह्यात वापरण्याचा निर्णय घेतला होता. जुलै महिन्यात जानकर यांची पुन्हा विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली आहे. या वेळी त्यांनी पुणे जिल्ह्यासाठी आमदार निधी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र राज्य सरकारकडून प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. पुणे जिल्ह्यात विधानसभेतील २१ आणि विधान परिषदेत चार आमदार आहेत.

नियोजन समितीकडून ५०५ कोटींची तरतूद 
पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन समितीकडून एकूण ५०५ कोटींची तरतूद केली आहे. त्यापैकी सुमारे ३७६ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, २३० कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. एकूण प्राप्त निधीपैकी ११० कोटी रुपये खर्च झाले आहेत. या निधीतून जलयुक्‍त शिवार, पाणलोट विकास, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. आमदार निधीतून अद्याप खर्च झालेला नाही.

Web Title: MLA fund for 50 crores in district