पिंपरी भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

उमेश घोंगडे
Thursday, 9 January 2020

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदासाठी विविध नावांवर चर्चा झाल्यानंतर आमदार महेश लांडगे यांचे नाव अंतिम करण्यात आले असून येत्या काही दिवसात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदासाठी विविध नावांवर चर्चा झाल्यानंतर आमदार महेश लांडगे यांचे नाव अंतिम करण्यात आले असून येत्या काही दिवसात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात सूतोवाच केल्याने आता लांडगे यांच्या नावाच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच नव्या शहराध्यक्षांची निवड होणार होती. मात्र, राज्यातील सत्तानाट्याच्या गडबडीत शहराध्यक्षपदाचा विषय मागे पडला. पक्षाचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात, माजी शहराध्यक्ष व पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सरचिटणीस राजू दुर्गे, राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन व माजी नगरसेविका तसेच प्रदेश भाजपाच्या सचिव उमा खापरे यांच्यासह अन्य काही नावांची चर्चा झाली होती. मात्र, पक्षाने आमदार लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे.

जेएनयू गर्ल्स हॉस्टेलवर सापडले कंडोम्स आणि सेक्स टॉइज? काय आहे सत्य?

आमदार लांडगे यांचे नाव घोषित करण्याआधी पक्षाला शहरातील दुसरे तगडे नेतृत्व आमदार लक्ष्मण जगताप यांचा होकार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या महत्वाच्या नेत्यांशी चर्चा करून येत्या चार दिवसात आमदार लांडगे यांचे जाहीर करण्यात येणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

Image result for Mahesh landge


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Mahesh Landge may confirms as Pimpri BJP president