
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर आता भाजपच्या कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांची व त्यांच्या आईची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे.
पुणे : राज्यात पहिला कोरोनाग्रस्त पुणे शहरात आढळल्यानंतर खळबळ माजली होती, राज्यात कोरोनाबाधितांचा हा आकडा १ लाखांच्या वर पोहचला आहे. आजही पुणे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं आहे, अशातच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर आता भाजपच्या कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांची व त्यांच्या आईची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. त्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.
Today me and my mother have been tested positive for Covid-19.
We both are not showing any symptoms & have been advised by doctors to be under home quarantine & have thus self-isolated.
All other family members have been tested negative.
Stay Home, Stay Safe
— Mukta Tilak (@mukta_tilak) July 7, 2020
अनेक राजकीय व्यक्तींना कोरोना झाल्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण हादरलं आहे. त्यातच सध्या पुण्यातील दोन खासदार आणि ४ आमदार यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे, तर आतापर्यंत महापालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
रांजणगाव गणपती येथील तिघांची कोरोनावर मात
पुण्यातील राजकीय पदाधिकार्यांना कोरोनाचा पडत असलेला विळखा हा चिंताजनक आहे. त्यामुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, मोहोळ यांनी पदाधिकारी व अधिकारयांसोबत नाला सफाई आणि पावसाळा पूर्व कामांचीदेखील पाहणी केली होती. या कालावधीत त्यांनी दोन वेळा कोरोना तपासणी केली होती. परंतु ही तपासणी निगेटिव्ह आली होती. पण 4 दिवसांपुर्वी केलेली टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, याबाबत आमदार टिळक यांनी टि्वट करत सांगितले की, माझी व माझ्या आईची कोरोना टेस्ट पा्ॅझिटिव्ह आली आहे. मात्र आम्हाला कुठलीही लक्षणे नाहीत. डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही होम क्वारंटाईन झालो आहोत. आमच्या बाकी कुटुंबातील सदस्यांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. नुकतेच टिळक यांच्या वडिलांचं निधन झाले आहे.
राजकीय नेत्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढत आहे. राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती, या नेत्यांनी कोरोनावर यशस्वी मात करत पुन्हा सार्वजनिक जीवनात परतले आहेत. तर अलीकडेच अपक्ष आमदार गीता जैन, आमदार महेश लांडगे, आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण झाली आहे.