यांनी शपथ घेतली; पण आमदारकीची

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

वाढदिवशीच शपथ
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने महाविकास आघाडीची घोषणा करत सत्ता स्थापनेचा दावा केला. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड झाली आणि राजभवनात आमदारांनी बुधवारी (ता. २७) शपथ घेतली. त्यात भाजपचे भोसरीतील आमदार महेश लांडगे यांचाही समावेश होता. त्यांचा बुधवारी वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठीचे फलक भोसरी मतदारसंघात लागले आहेत.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शनिवारी शपथ घेतली आणि शहराला मंत्रिपद मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यापैकी एकाची मंत्रिपदाची वर्णी लागेल आणि ते शपथ घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने मंत्रिपदाचे स्वप्न पुन्हा लांबणीवर पडले. परंतु, जगताप व लांडगे यांनी आमदारकीची शपथ घेतली.

वाढदिवशीच शपथ
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने महाविकास आघाडीची घोषणा करत सत्ता स्थापनेचा दावा केला. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड झाली आणि राजभवनात आमदारांनी बुधवारी (ता. २७) शपथ घेतली. त्यात भाजपचे भोसरीतील आमदार महेश लांडगे यांचाही समावेश होता. त्यांचा बुधवारी वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठीचे फलक भोसरी मतदारसंघात लागले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Oath by Mahesh Landage and Laxman Jagtap