भीमा पाटस कारखान्यावर अनेकजण टपून : कुल

Rahul Kul
Rahul Kul

केडगाव, जि.पुणे : शेतक-यांच्या मालकीचा कारखाना टिकवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. माझे व कामगारांचे जगणे आणि मरणे भीमा पाटस कारखान्याशी निगडीत आहे. ही संस्था टिकली तर दोघांना भवितव्य आहे. कारखाना बंद पडला तर तो विकत घ्यायला बरेच जण टपून बसले आहेत. असे मत कारखान्याचे अध्यक्ष व आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले आहे. 

भीमा पाटस कारखान्याच्या 38 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी कुल बोलत होते. भीमा पाटसच्या कामगारांनी पगारासाठी जी आंदोलने केली त्यातून कारखान्याची प्रतिमा मलीन झाली आहे असे कुल यांचे मत आहे. त्याचा धागा पकडत कामगारांना उद्देशून कुल बोलत होते. भीमा पाटसला सुस्थितीत आणले तरच सभासदांबरोबर स्वतःला अच्छे दिन येतील हे कुल यांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केले आहे. 

ते म्हणाले, कामगारांनी कारखान्यात व बाहेर असताना संस्थेशी प्रामाणिक राहिले पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केले पाहिजे. भीमा पाटसपेक्षा जास्त अडचणीत असलेले कारखाने मी पाहिले आहेत. मात्र भीमा पाटसच्या अडचणींचे खूप भांडवल केले जाते. महसुल विभागाने साखर जप्त करून विकल्याने एकाच दिवशी दोन लाख टन साखर विकू शकलो. याबाबतीत जे झाले ते चांगले झाले. असे माझे मत आहे. माझे राजकीय नुकसान झाले तरी चालेल पण कारखान्याला स्थिरता आली पाहिजे अशी माझी भावना आहे. प्रचंड खस्ता खाऊन भीमा पाटस पुन्हा सुरू केला आहे. कारखान्याचे संस्थापक स्व.मधुकाका शितोळे व स्व. सुभाष कुल यांचे शेतकरी उत्थानाचे स्वप्न साकार होण्याचे दिवस लांब नाहीत. 

सभासदांना साखर विक्री, अतिरिक्त कामगार, कर्जाचे प्रचंड व्याज यामुळे मोठा आर्थिक बोजा कारखान्यावर पडत होता. नवीन भरती न केल्याने कामगारांची संख्या गेल्या 16 वर्षात 1600 वरून 800 वर आली आहे. गेल्या हंगामात ऊस दिलेल्या व दोन हजार रूपये दर मिळालेल्या सभासदांना आणखी ऊस बिल दिले जाणार आहे. गेल्या हंगामात साखर तारण कर्ज न मिळाल्याने व साखर दर घसरल्याने अडचणी आल्या होत्या. यंदा तशी परिस्थिती नाही.  भीमा पाटस कारखान्यात ऊस गाळप झालेल्या उसाला 15 दिवसात पेमेंट दिले जाईल. ऊस पेमेंट देण्याबाबत कारखान्याकडे चार पर्याय उपलब्ध असल्याने यंदा बीलाबाबत कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे सभासदांनी भीमा पाटसला गाळपासाठी ऊस द्यावा असे आवाहन कुल यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com