MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आमदार सत्यजीत तांबे सहभागी! म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tambe satyjit

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आमदार सत्यजीत तांबे सहभागी! म्हणाले...

पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पध्दतीत केलेले बदल २०२५ पासून लागू करावेत. तसेच याबद्दलचे नोटीफिकेशन लगेच जारी करण्यात यावे यासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी देखील सहभाग घेतला आहे. 

सत्यजीत तांबे म्हणाले, एमपीएससीने आडमुठी भूमिका घेण्याचे कारण नाही. विद्यार्थ्यांची मागणी आहे. समाजातील लोकांची मागणी आहे तर एमपीएससीला काय अडचन आहे, हा आमचा मुद्दा आहे. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले - 

मी आणि मुख्यमंत्र्यांनी आयोगाशी याबद्दल चर्चा केली. हे शक्य नाही, हे २०२५ पासूनच लागू केलं पाहिजे असे आयोगाला सांगितले आहे. तसेच पुन्हा आयोगाची बैठक घेऊन यासंदर्भात निर्णय करा अन्यथा याविरोधात आम्हाला कायदेशीर बाजू घेऊन कोर्टात जावे लागेल असेही आयोगाला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.

आयोगाला कुठल्याही पध्दतीने विद्यार्थ्यांचे म्हणणे पटवून देता येईल. जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तो पर्यंत आयोगाकडे नवीन जागा देखील पाठवत नसल्याचे देवेंद्र फडणीवस यावेळी म्हणाले. पहिलं हा निर्णय करावा असा प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले की, सरकार शंभर टक्के आपल्या बाजूने आहे. आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आवश्यकता पडल्यास आम्ही कोर्टात जाऊ. पण हा निर्णय करून घेतला जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिलं.

टॅग्स :mpscSatyajeet Tambe