बेघरांना हक्काचे घर देण्यासाठी प्रयत्नशील राहणार : आमदार शरद सोनवणे

दत्ता म्हसकर
रविवार, 9 डिसेंबर 2018

जुन्नर, : पंतप्रधान आवास योजनेतून जुन्नर शहरातील सुमारे दोन हजार बेघरांना हक्काचे घर देण्यासाठी प्रयन्तशील राहणार असल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी येथे सांगितले. मातृभूमी बेघर महिला आघाडी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) जुन्नरच्या वतीने नु

जुन्नर, : पंतप्रधान आवास योजनेतून जुन्नर शहरातील सुमारे दोन हजार बेघरांना हक्काचे घर देण्यासाठी प्रयन्तशील राहणार असल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी येथे सांगितले.

मातृभूमी बेघर महिला आघाडी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) जुन्नरच्या वतीने नुकतेच रोजी-रोटी-मकान चिंतातुर परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. रिपाईचे पोपट राक्षे अध्यक्षस्थानी होते. मातृभूमी बेघर महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच बेघर महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

सोनवणे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्या समवेत लवकरच या प्रश्नासाठी बैठक घेणार बेघरांना हक्काचे घर देण्याचा प्रश्न येत्या दहा दिवसांत मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जुन्नरमधील बेघरांकरिता राज्य शासनाने १९८९ रोजी जागा दिलेली असून तेथे घरकुल बांधून मिळण्याकरिता ३५ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी योजनेतून या प्रश्नाला गती आलेली आहे.

जुन्नर नगर परिषदेच्यावतीने ३ हजार बेघरांच्या मुलाखती मागील वर्षी पूर्ण केलेल्या आहेत. या घरकुलांच्या कामाचा शुभारंभ होण्याकरिता लवकरच उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशी मागणी आयोजक संभाजी साळवे यांनी केली. यावेळी भगवान घोलप, पोपट सोनावणे,संजय नवले, देवराम मुंढे, श्रीकांत कसबे ,वसंत साळवे आदींनी आपले विचार व्यक्त केले. तारा वंजारी यांनी आभार मानले.

Web Title: MLA Sharad Sonawane will continue to work for Home to the homeless