आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणतायेत, पुण्यातील ते पुल पाडण्याआधी....

MLA Siddharth Shirole has demanded proper traffic management and presentation of new bridge plan to organizations and experts
MLA Siddharth Shirole has demanded proper traffic management and presentation of new bridge plan to organizations and experts

पुणे : राज्य सरकारने गणेशखिंड रस्ता-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ई-स्क्वेअर हे दोन उड्डाणपूल पाडण्यासाठी मंजूरी दिली आहे. मात्र, ते पाडण्यापूर्वी वाहतुकीचे योग्य नियोजन करावे आणि नवीन पुलाचा आराखडा (डिझाईन) स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञ व्यक्तींसमोर सादर केले जावे अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्य सरकारने दोन्ही उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेतला. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार शिरोळे म्हणाले, ''शहराच्या भविष्यकालीन मूलभूत सुविधांचा विचार करता त्यांचा दर्जा वाढण्याची गरज आहे आणि त्यादृष्टीने दोन्ही उड्डाणपूल पाडण्याची आवश्यकता आहे. परंतु राज्य सरकार आणि पीएमआरडीएच्या प्रशासनाला माझी विनंती आहे की, ''हे दोन उड्डाणपूल पाडण्यापूर्वी नवीन पुलाच्या बांधणीचे जे नियोजन, आराखडा करण्यात येईल त्याचे स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांसमोर सादरीकरण करण्यात यावे. त्यातून या डिझाईनचेे मूल्यमापन होईल तसेच त्याची उपयुक्तता अधिकाधिक वाढेल आणि काम परिपूर्ण होईल.''

दिलीप बंड म्हणतात, विद्यापीठ रस्त्यावरील तीनही पूल पाडणे योग्यच

सध्याच्या पुलांचे बांथकाम चालू असताना, वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने गोंधळ उडाला होता आणि सदोष आराखड्यामुळे प्रत्येक वाहनचालकासाठी वाहतूक त्रासदायक झाली होती. या त्रुटी लक्षात घेऊन पूल पाडण्यापूर्वी वाहतुकीचे योग्य नियोजन व्हावे, नवीन पुलाचा आराखडा तज्ज्ञांसमोर मांडला जावा आणि कामाचा कालबद्ध कार्यक्रम आखला जावा अशा तीन महत्त्वाच्या सूचना असल्याचे आमदार शिरोळे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com