आमदार टिळेकरांचा एवढा मोठा हार मुख्यमंत्र्यांना रिचवणार का?

Pune
Pune

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज (शनिवार) पुणे शहरात येत असून, हडपसर मतदार संघाचे आमदार  योगेश टिळेकर यांनी हडपसर गाडीतळ येथे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री यांना घालण्यासाठी २७० किलो फुले वापरून हार तयार करवून घेतला आहे. टिळेकर हडपसर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

मार्केट यार्ड फुल बाजारमधील फुलांचे व्यापारी व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हरिभाऊ कामठे यांनी हा हार तयार केला आहे. या हारामध्ये १०० किलो हिरवी पाने आणि १७० किलो झेंडू व इतर फुलांचा वापर केला आहे. १५महिला कामगार आणि १० कारागीर यांनी मेहनत घेऊन या महाकाय हाराची निर्मिती केली आहे. या हाराला योग्य गोल आकार यावा या साठी सहा सायकलच्या चाकांच्या स्टीलच्या रिमचा वापर केला आहे.

या पूर्वी गुजरातमध्ये १६० किलो वजनाचा हार बनविण्यात आला होता. त्याचा विक्रम मोडून लिम्का वर्ल्ड बुकमध्ये नोंद होण्यासाठी या हाराची निर्मिती केली आहे. आज सायंकाळी आमदार योगेश टिळेकर हडपसर येथे क्रेनचा वापर करून मुख्यमंत्र्यांना हा हार घालणार आहेत, असे हरिभाऊ कामठे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com