‘एमएमसी’साठी आज निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

पुणे - महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (एमएमसी) नऊ जागांसाठी येत्या रविवारी (ता. १८) निवडणूक होणार असून, त्यासाठी ४९ उमेदवार रिंगणात आहेत. पुण्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय येथे हे मतदान होईल.

पुणे - महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (एमएमसी) नऊ जागांसाठी येत्या रविवारी (ता. १८) निवडणूक होणार असून, त्यासाठी ४९ उमेदवार रिंगणात आहेत. पुण्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय येथे हे मतदान होईल.

पुणे जिल्ह्यातील डॉक्‍टरांनाही मतदानासाठी पुण्यातील मतदान केंद्रांवर यावे लागणार आहे. या वर्षी प्रथमच मतपत्रिकांना बारकोड लावण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया पारदर्शी होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पुण्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेबद्दल मतदार आणि उमेदवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मतदान प्रक्रियेत निवडणूक नियमावलीप्रमाणे केंद्रापासून दोनशे मीटर अंतरावर वाहने उभी करावी लागणार आहेत. तसेच मतदारांना मदत करण्यासाठी उमेदवारांना याच अंतरावर उभे राहावे लागेल. याच दरम्यान ॲट्रॉसिटी कायद्याला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन बहुजन क्रांती मोर्चा आयोजित केला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात वाहनांच्या पार्किंगला जागा मिळणार नाही आणि ससून रुग्णालयात निवडणूक असल्याने वाहने कुठे पार्क करायची, असा सवाल काही डॉक्‍टरांनी उपस्थित केला. 

डॉ. नितीन भगली म्हणाले, ‘‘बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाच्या परिसरात मतदारांसाठी वाहन व्यवस्था करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार मतदारांना वापरता येईल.’’
रविवारी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळात हे मतदान होईल. त्याची सर्व व्यवस्था पूर्ण झाली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकर गोकुळे यांनी दिली.

Web Title: mmc election in pune