पुणे - विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मनपा शाळा सज्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

औंध (पुणे) : मनपा शाळात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय क्रमिक पुस्तकांसह भौतिक सुविधा पुरवण्यास शाळा सज्ज झाल्या असून विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस विस्मरणीय ठरावा यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

पहिल्याच दिवसापासून  विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आपुलकी निर्माण व्हावी व भीती दूर व्हावी यासाठी त्यांचे स्वागत करून क्रमिक पुस्तकांचे यावेळी करण्यात येणार असल्याचे सहायक शिक्षण अधिकारी शिवाजी बोखारे यांनी सांगितले. तसेच जे शालाबाह्य मुले आहेत त्यांच्या शाळा प्रवेशासाठी यावर्षी शिक्षकांचे उदबोधन करण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद यावर्षी मिळत  आहे.

पटनोंदणीही चांगल्या प्रकारे झाली असून शिक्षणापासून एकही मुल वंचित राहणार नाही यासाठी पालिकेच्या  शिक्षण विभागाच्या  वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खास मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही बोखारे यांनी सांगितले.शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर यांच्या निर्देशाप्रमाणे सर्व शाळा वंचित व सामान्य कुटूंबातील सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी न  स्वागत करण्यासाठी सज्ज झाल्याचेही बोखारे यांनी सांगितले.

Web Title: mnc schools are ready to welcome students