एमएनजीएलचे ग्राहक गॅसवर!

जितेंद्र मैड
मंगळवार, 19 जून 2018

पौड रस्ता - गॅसला नंबर लावण्याचा किंवा सिलिंडर वाहून आणण्याचा ताण नको... स्वस्तात घरपोच सेवा अन्‌ हवा तेवढा गॅस वापरा... अशा लोभसवाण्या जाहिराती एमएनजीएल (महाराष्ट्र नेचरल गॅस लिमिटेड) कंपनीकडून केल्या जात आहेत. मात्र परिसरातील अनेक ग्राहकांनी अनामत रक्कम भरूनही कंपनीकडून त्यांना अद्याप गॅस कनेक्‍शन मिळाले नाही. यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कंपनीच्या लोभसवाण्या जाहिरातींकडे अनेक ग्राहक आकर्षित होत आहे. काही ग्राहकांना अनामत रक्कम भरून कनेक्‍शन मिळाले नाही. मात्र त्यांना बिल येत आहेत. कुठे इमारतीजवळ गॅस वाहिनी आली असली, तरी ग्राहक या सेवेपासून वंचित आहेत. कुठे बिल्डिंगला पाइप बसवले असले, तरी प्रत्यक्षात रस्त्यापर्यंत अद्याप गॅस वाहिनीच आली नाही. 

याबाबत कंपनीच्या ग्राहक सेवा प्रतिनिधींशी संपर्क साधला असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तसेच कंपनीच्या कार्यालयात दूरध्वनीवरून संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

कनेक्‍शन नसताना बिल
विकास उत्तुरकर यांनी सांगितले, की आम्ही २०१६ साली गॅस कनेक्‍शनसाठी सहा हजार रुपये भरले. इमारतीला गॅसच्या नळ्या लावल्या असल्या, तरी अजूनही गॅस वाहिनी आली नाही. मध्यंतरी २०१७ मध्ये मला ३ हजार ८१४ रुपये गॅस बिल आले होते. याबाबत तक्रार करण्यासाठी करण्यासाठी अनेकवेळा कंपनीशी फोनवर संपर्क साधला; पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. 

कारभाराची चौकशी करावी 
ग्राहकांनी पैसे भरूनही एमएनजीएल कंपनी त्यांना गॅस सुविधा पुरवू 
शकली नाही. ही गंभीर बाब आहे. ग्राहकांना न्याय मिळण्यासाठी 
कंपनीच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी शिवाजी शेळके यांनी 
केली आहे.

एमएनजीएलवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही. कंपनीने एका ग्राहकांकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) जमा केली आहे. त्यानंतरही ग्राहकांना अद्याप सेवा देण्यात आली नाही. यामुळे डिपॉझिटवर किती व्याज होईल, याचा विचार कोणीही करत नाही. जोपर्यंत सेवा मिळत नाही, तोपर्यंत कंपनी ग्राहकांना व्याज देणार आहे का, सरकारने याबाबत तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.
- अविनाश दंडवते, ग्राहक.

Web Title: MNGL customer issue