रस्ता खोदताना 'एमएनजीएल'ची गॅस पाईपलाईन तुटल्याने ग्राहकांचा खोळंबा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. बुधवार ता.१६ खोदकामात येथील एमएनजीएलची गँस पुरवठा करणारी पाईपलाईन तुटल्याने दुरूस्ती होईपर्यंत काम तर थांबलेच पण नागरीकांचाही खोळंबा झाला.

जुनी सांगवी - आधीच रस्त्याची रखडलेली कामे यातच गँस पाईपलाईन,लाईटची केबल,पाण्याची लाईन रस्ते खोदकामात तुटत असल्याने नागरीकांना विकास कामे नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

नवी सांगवी,जुनी सांगवीला जोडणा-या माहेश्वरी चौकात गेली अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. बुधवार ता.१६ खोदकामात येथील एमएनजीएलची गँस पुरवठा करणारी पाईपलाईन तुटल्याने दुरूस्ती होईपर्यंत काम तर थांबलेच पण नागरीकांचाही खोळंबा झाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माहेश्वरी चौकात महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम चालू असून, त्याअंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्यात येत आहे.

हे काम करत असताना दुपारी  जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करत असताना रोड क्रॉसिंग झालेली गॅस ची लाइनला जेसीबी चा धक्का लागला.  लाइन फुटून त्यातून गॅस बाहेर येऊ लागला, महाराष्ट्र नॅचरल गॅसचे अधिकाऱ्यांनी तात्काळ या भागातील वाहिनीचा पुरवठा प्रवाह बंद केल्याने अनर्थ टळला.तसेच तात्काळ तुटलेल्या पाईप लाईनची दुरूस्तीही करण्यात आली.यामुळे मात्र गँस धारकांसोबतच रस्त्याचे काम काही काळ थांबल्याने नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNGL Gas pipeline in Sangvi Road Excavation