'लाव रे तो व्हिडिओ' ते 'करा रे ती चौकशी'

Raj Thackeray
Raj Thackeray

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात 'लाव रे तो व्हिडिओ'चे फर्मान सोडत, राज्यभर फिरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या कारभाराच्या चिंध्या उडविण्याची मोहीम आखलेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आता 'करा रे ती चौकशी' हे ऐकण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, राज यांच्या सभांप्रमाणेच त्यांच्या "ईडी'चौकशीही चर्चा आता उत्सुकतेची ठरली आहे. दादरमधील कोहिनूर मिल प्रकरणी नोटिस आल्याने राज यांनी सहकुटुंब गुरुवारी सकाळीच "ईडी'चे कार्यालय गाठले. 

लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार नसतानाही राज यांनी सबंध राज्य पिंजून काढले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करीत राज यांनी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांवर विशेषत: मोदी आणि शहा या जोड गोळीला "टार्गेट' केले. मागील लोकसभा निवडणुकीआधी आणि त्यानंतर सत्ता मिळताच मोदींनी दिलेल्या आश्‍वासनांची खिल्ली उडत, राज यांनी राज्यात निवडणुकांचा माहोल तयार केला. प्रत्येक सभांमध्ये मोदी आणि शहा यांच्या भाषणाच्या क्‍लिप' दाखवून त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बाहुत बळ भरण्याचा मोठा प्रयत्न त्यांनी केला. तेव्हा, "लाव रे तो व्हिडिओ' म्हणत, मोदी काय बोलले होते ? आता काय वस्तुस्थिती आहे ? , हे पटवून देण्याचा प्रयत्न राज सततकरीत होते. त्यामुळे "लाव रे तो व्हिडिओ'ची चर्चा रंगली होती. त्यांच्या राज्यात प्रचंड गर्दी झाल्याने तेव्हा भाजपला धडकी भरल्याचे बोलले जात होत. याच राज यांना आता "करा रे ती चौकशी'च्या आदेशावर "ईडी'च्या कार्यालयाची पायरी चढावी लागली आहे. कोहिनूरप्रकरणी राज यांची सकाळपासून चौकशी सुरू झाली असून, तित "कोहिनूर राज' उलगडण्याची शक्‍यता आहे. 

ऐन निवडणुकीच्या तोंडावर देश आणि राज्यात "ईडी'च्या चौकशीचा धुराळा उडत असला तरी, राज यांना बजाविलेल्या नोटिस आणि त्यांच्या चौकशीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com