मनसेच्या नगरसेविका अनिता डाखवे भाजपमध्ये 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणूक अवघी दहा दिवसांवर आली असताना कसबा पेठ-सोमवार पेठ या प्रभाग क्रमांक 16 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका अनिता डाखवे, त्यांचे पती भैया डाखवे, प्रभाग 16 (अ)मधील अपक्ष उमेदवार जयश्री कांबळे, संभाजी ब्रिगेडच्या रंजना जाधव, कॉंग्रेसच्या पुणे कॅंटोन्मेंटच्या महिला आघाडी अध्यक्ष स्मिता पवार यांच्यासह कॉंग्रेसच्या अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. 
पालकमंत्री गिरीश बापट आणि नगरसेवक व प्रभाग 16 (ब)मधून महापालिकेची निवडणूक लढवणारे गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 

गिरीश बापट म्हणाले, ""भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून तुम्ही अतिशय योग्य वेळी योग्य असा निर्णय घेतला आहे. भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना नेहमीच साथ दिली असून, तुम्हा सर्वांनाही न्याय मिळेल यात शंका नाही. प्रभाग 16मध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्‍चित असून, केवळ किती हजार मतांच्या फरकाने आपला पॅनेल विजयी होईल, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.'' 

कसबा-सोमवार पेठ परिसरातील देवेंद्र उर्फ छोटू वडके, युवराज रूके, शैलेश पिंपळे, ओंकार वडके, विजय ठाकर, बाबू पोरे, कुमार गायकवाड, चंदू इनामदार, ओंकार पोटफोडे, मिलिंद तिकोणे, मंदार पाटील, राकेश सोरटे, सूरज मुठे, सागर पिंगळे, राकेश डाखवे, सुधीर डाखवे या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणूक प्रचारात भाजपच्या विजयासाठी एकजुटीने प्रचार करण्याची शपथ त्यांनी या वेळी घेतली.

Web Title: MNS corporator Anita dakhave enters bjp