अनधिकृत फ्लेक्सवर कारवाईची मनसेची मागणी

बाबा तारे
मंगळवार, 10 जुलै 2018

पुणे : घोले रस्ता क्षेत्रिय कार्यालय व औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत असलेल्या पथदिव्यांच्या खांबावर क्लासचालक, बांधकाम व्यावसायिक, मोबाईल कंपन्या, ज्वेलर्स, मॉल व्यावसायिक यांनी छोटे मोठे फ्लेक्स आकाशचिन्ह विभागाची परवानगी न घेता लावलेले आहेत. हे फ्लेक्स संपूर्णपणे अनधिकृत असून विनापरवाना लावण्यात आलेले हे फ्लेक्स अपघाताला निमंत्रण देतात तरी पालिकेच्या वतीने कारवाई करुन काढून टाकण्यात यावेत अशी मगणी मनसेचे शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष सुहास निम्हण यांनी पालिका आयुक्त, सहायक आयुक्त औंध - बाणेर व सहायक आयुक्त घोलेरस्ता क्षेत्रिय कार्यालय यांना निवेदनाद्वारे केली आहे.

फ्लेक्समुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत असून पथदिव्यांचा प्रकाशही खाली पदपथावर पडत नसल्याने पादचाऱ्यांना अंधारातच आपला मार्ग शोधावा लागत आहे. काही ठिकाणी या फ्लेक्स बांधलेल्या दोऱ्या व तारा खराब झाल्यामुळे फ्लेक्स लोंबकळलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात असे अनधिकृत फ्लेक्स लावले जात असतांना याकडे पालिकेचे मात्र दुर्लक्ष होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वाऱ्याने ते एखाद्या पादचाऱ्यांच्या तसेच वाहनचालकांच्या अंगावर पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे नागरिकांनी याबद्दल अनेक तक्रारी मनसे कार्यालयात दिल्या आहेत. त्यावरुन निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तरी अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर त्वरित कारवाई करून फ्लेक्स काढून टाकले नाही तर 'मनसे स्टाईल' आंदोलन केले जाईल. तसेच या फ्लेक्समुळे कुणाला दुखापत झाल्यास संबंधितांना जबाबदार धरले जाईल याची आपण नोंद घ्यावी अशा आशयाचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

Web Title: MNS demand for action on unauthorized Flex