नोटीस पाठवून चंद्रकांत दादांनी बदला घेतला- रुपाली पाटील (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

गणेशोत्सव सुरु होण्याआधी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना गणेशमंडळाच्या अध्यक्षपदाची ऑफर करणाऱ्या मनसे महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली पाटील यांना पुढचे तीन दिवस शहराबाहेर राहण्याचे नोटीस पुणे पोलिसांनी बजावली आहे.

पुणे : गणेशोत्सव सुरु होण्याआधी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना गणेशमंडळाच्या अध्यक्षपदाची ऑफर करणाऱ्या मनसे महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली पाटील यांना पुढचे तीन दिवस शहराबाहेर राहण्याचे नोटीस पुणे पोलिसांनी बजावली आहे.

ही नोटीस मिळताच, रुपाली पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करीत राजकीय द्वेषातून माझ्यावर करावाई करत असल्याचा आरोप भाजप सरकारवर केला आहे. या नोटीसीमुळे मी माझ्या घरातील गणपतीचे विसर्जन करायचे नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्र्यांवर आरोप केल्यानेच मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे असेही पाटील यांनी सांगितले.

पुण्याचा गणेशोत्सव अत्यंत आनंदात शांततेत पार पडावा आणि स्पीकरची परवानगी दोन बेस दोन टॉप आणि बारा वाजेपर्यंत देण्यात यावी आमची हिंदु संस्कृती हिंदू सण आनंदात साजरे होऊन द्यावेत. अर्थात हे निवेदन सरकार म्हणून केले, आपण गणेश उत्सव साजरा करताना समन्वयाची भूमिका बजवावी आणि गणेश मंडळ कार्यकर्त्यांना त्रास देऊन खोटे गुन्हे दाखल करू नये, असे निवेदन केले होते आणि तेच पालक मंत्री दादांना खूपच झोंबलेले दिसते म्हणूनच पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून आपण पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून अशा पद्धतीची नोटीस त्यांनी मला बजावली असल्याचे रुपाली पाटील यांनी म्हटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns leader Rupali patil criticise on Chandrakant patil