मनसेचा पुण्यातील हा नेता म्हणतो की, पडळकर जेवढं तुमचं वय, तेवढा पवार साहेबांचा अनुभव

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

'पडळकर तुमचे जेवढे वय आहे ना, त्या पेक्षा किती तरी जास्त वर्षे शरद पवार साहेब राजकारणात आहेत', असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला मारला आहे. लूज टॉकमुळे कोंडीत सापडलेल्या भाजपला अडचणीत आणण्याची संधी मनसेही सोडत नसल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे. 

पुणे : 'पडळकर तुमचे जेवढे वय आहे ना, त्या पेक्षा किती तरी जास्त वर्षे शरद पवार साहेब राजकारणात आहेत', असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला मारला आहे. लूज टॉकमुळे कोंडीत सापडलेल्या भाजपला अडचणीत आणण्याची संधी मनसेही सोडत नसल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल पडळकर यांनी काढलेल्या आक्षेपार्ह उदगारांबद्दल राज्यातील राजकीय वर्तुळातून तीव्र पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यासह विविध जिल्ह्यांत आंदोलने करीत, पडळकरांचा निषेध केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही त्या बाबत सारवासारव करीत पडळकर यांनी माफी मागितल्याचे म्हटले असले तरी, हा वाद क्षमलेला नाही. आता त्यात वसंत मोरे यांनीही उडी मारली असून शरद पवार यांची बाजू घेतानाच 'आजकाल लोक प्रसिद्धीसाठी काहीही करू लागलेत. आमदार पडळकर जेवढे तुमचे वय आहे ना, त्या पेक्षा किती तरी, जास्त वर्षे शरद पवार साहेब राजकारणात आहेत', असे म्हणत त्यांनी पडळकरांना टोला मारला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS leader Vasant More criticized by BJP MLA Gopichand Padalkar