मनसेचा जाहीरनामा उद्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापालिका निवडणुकीसाठीचा "जाहीरनामा' गुरुवारी (ता. 16) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नियोजित जाहीर सभेदरम्यान आता हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले. 

राज्याच्या विकासाची "ब्ल्यूप्रिंट' घेऊन निवडणुकांमध्ये उतरलेल्या "मनसे'चे इंजिन यंदा मात्र "स्लो ट्रॅक'वर चालले आहे. प्रचाराची मुदत संपण्यासाठी अवघे पाच दिवस राहिले असतानाही मनसेचा जाहीरनामा मतदारांसमोर आलेला नाही. तो मंगळवारी प्रसिद्ध करण्यात येणार होता, मात्र हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस या चारही पक्षांचे जाहीरनामे आणि वचननामे प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्यापेक्षा मनसेचा जाहीरनामा वेगळा असेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. काही अपरिहार्य कारणास्तव रद्द झालेला "रोड शो' आणि पुढे ढकलण्यात आलेली सभा यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. ते दूर करण्यासाठी ठाकरे यांच्याच हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्याचे नियोजन आता पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

Web Title: MNS manifesto tomorrow