पुण्यात राज ठाकरे यांनी घेतली बाबसाहेब पुरंदरे यांची भेट: या मुद्दयांवर झाली चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज यांनी राजकीय 'ट्रॅक' बदलला असून आता त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला आहे. बदलत्या समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर राज पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनी पक्षाच्या मोजक्‍या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पुरंदरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि राजकीय विषयांवर चर्चा केली.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. पक्षाचा नवा झेंडा आणि धोरणांबाबत त्यांनी पुरंदरे यांच्याशी चर्चा केली. नव्या राजकीय भूमिकेबाबत त्यांना पुरंदरे यांच्याकडून काही 'सल्ले'ही घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दाम्पत्यचा मृत्यू; वाहतूककोंडीही मृत्यूस जबाबदार

Image

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज यांनी राजकीय 'ट्रॅक' बदलला असून आता त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला आहे. बदलत्या समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर राज पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनी पक्षाच्या मोजक्‍या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पुरंदरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि राजकीय विषयांवर चर्चा केली.

पुणे : वाहतूक नियमांचे केले उल्लंघन; झाला तब्बल ७० हजारांचा दंड

येत्या पंधरा दिवसांत ते पुन्हा पुण्यात येऊन पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्ष संघटनेचा आढावा घेणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. पुण्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर राज पक्षाच्या मेळाव्यासाठी औरंगाबादकडे रवाना झाले. 

हात सोडून 'बाईक' चालवणे जिवावर बेतले:दोन तरुणांचा मृत्यू 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS president Raj Thackeray talks with Babasaheb Purandare about the new flag and policies of the party