"साहेब तुम्ही बसा मी आहे ना"; वसंत मोरेंनी राज ठाकरेंना दिला विश्वास : Vasant More | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray_Vasant More

Vasant More: "साहेब तुम्ही बसा मी आहे ना"; वसंत मोरेंनी राज ठाकरेंना दिला विश्वास

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील धायरी भागात मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी मनसे नेते वसंत मोरे देखील उपस्थित होते. यावेळी एका प्रसंगी राज ठाकरेंनी काहीशी भीती व्यक्त केली. पण वसंत मोरे यांनी "मी आहे ना" असा शब्दांत त्यांना विश्वास दिला. (MNS Pune leader Vasant More gives trust to Raj Thackeray at Party event)

हेही वाचा: UP Villages: योगींच्या यूपीत आणखी दोन गावांची नावं बदलली! एकाचा संबंध थेट म. गांधींच्या लढ्याशी

धायरीतील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडल्यानंतर खुर्चीवर बसताना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विचारलं, "खुर्ची व्यवस्थित आहे ना? मागे कुणाचीतरी खुर्ची तुटली होती" यावर वसंत मोरे यांनी "चंद्रकांत पाटील यांची खुर्ची तुटली होती" असं उत्तर दिलं. पण त्याचवेळी "साहेब तुम्ही बसा मी मागे आहे" अशा शब्दांत त्यांना बिनधास्तपणे खुर्चीत बसण्याचा विश्वासही दिला.

हेही वाचा: Prakash Ambedkar: "चंद्रकांत पाटलांचं जाहीर अभिनंदन करतो; आंबेडकर असं का म्हणाले?

मला तुम्ही साधू करणार वाटतं

या कार्यक्रमावेळी राज ठाकरे यांचं स्वागत भगवी शाल देऊन करण्यात आलं. यावेळी "तुम्ही मला साधू करणार वाटतं," अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केली. सध्या राज ठाकरे जिथं जिथं जातायेत तिथं त्यांचं भगवी शाल देऊन सत्कार केला जात आहे. यावरुनच राज ठाकरेंनी हे मिश्किल विधान केलं आणि एकच हशा पिकला.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

राज ठाकरे नाराज नाहीत?

या कार्यक्रमाचं वैशिष्ट म्हणजे राज ठाकरे आणि वसंत मोरे या कार्यक्रमात एकत्र दिसले. इतकंच काय तर कार्यालयाचं उद्घाटन करताच राज ठाकरेंनी वसंत मोरेंच्या खांद्यावर हात ठेवला आणि अक्षरशः कॅमेरॅचे फ्लॅश पडू लागले. आजच्या कार्यक्रमात हे दोघे बऱ्याच वेळ एकत्र चर्चा करताना दिसले यामुळं वसंत मोरे यांच्यावर राज ठाकरे नाराज नसल्याचं स्पष्ट झालं आहे.