तर परराज्यातील मुलांवर मनसेचे बारीक लक्ष असेल : राज ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

पुणे : महाराष्ट्रात जन्मलेले असून रहिवासी दाखला सादर करणे सक्तीचे केले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या "नीट' परीक्षेमध्ये देखील मराठी मुलांना डावलून बाहेरच्या राज्यातील मुले घुसविण्याचा प्रयत्न केला जातोय. पण जर परराज्यातील मुलांना प्रवेश द्यायचा प्रयत्न केलात तर या विद्यार्थ्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बारीक लक्ष असेल, असा धमकीवजा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत ठाकरे बोलताना म्हणाले,""दरवर्षी नीट परीक्षेत गोंधळ असतो. राज्यसरकारने जो रहिवासी दाखल्याचा नियम केला तोच नियम तमिळनाडू, कर्नाटकात आहे. ज्या विद्यार्थ्यांची दहावी, बारावी महाराष्ट्रात झाली, त्यांनाच वैद्यकीय प्रवेश घेता येईल, असा नियम आहे. त्यासाठी अन्य राज्यांनी नियमांना कायदेशीर चौकट घातली आहे. परंतु महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची कायदेशीर चौकट घातलेली नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत त्यांच्या प्रवेशांना न्यायालयाने "जैसे थे' आदेश दिला आहे.'' 

"तमिळनाडूत विद्यार्थ्यांनी तमीळ भाषेत नीट परीक्षा दिली. त्यामध्ये चार प्रश्‍न चुकले होते तर एक खासदार न्यायालयात गेला. त्यानंतर न्यायालयाने ज्या चुका झाल्या त्याचे गुण देण्याचा आदेश दिला. महाराष्ट्रातील आमदार व खासदार काय करत आहेत. त्यांना काही देणेघेणे आहे की नाही. बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी हे काही आमचे शत्रू नाहीत. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा प्रवेश मिळायला हवा, त्यानंतर जर काही जागा उरल्या तर मग इतर राज्यातल्या विचार करा,''असे त्यांनी यावेळी सांगितले. 

वल्लभभाई पुतळ्याचे काय झाले ः राज ठाकरे 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवरून विधानसभेत जो गोंधळ झाला. त्यावरून जे राजकारण सुरू आहे, पण वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ताटे, चमचे आणि स्टीलची भांडी गोळा केलीत, त्याचे काय झाले कोणीही विचारणार नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी यावेळी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल पटेलांचे मत काय होते, हे जर कळाले तर त्यांच्याच अंगावर येईल, असेही ते म्हणाले. 

Web Title: the mns will have a keep eye on the children of the other state: raj Thkare