पार्किंगच्या वादात निघाले कोयते; फुरसुंगीत टोळक्याकडून तरुणावर वार

पार्किंगच्या वादात निघाले कोयते; फुरसुंगीत टोळक्याकडून तरुणावर वार

पुणे : कार पार्किंग करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात 20 जणांच्या टोळक्‍याने तरुणावर कोयत्याने वार केले. त्याचबरोबर तरुणाच्या डोक्‍यात दगड घालून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजता फुरसुंगीतील संकेत विहार परिसरामध्ये घडली. टोळक्‍याने हत्यारे हवेत भिरकावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली.

राहूल घडई (वय 23, रा. काळेपडळ ) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 20 जणांविरूद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घडई हा फुरसुंगीतील संकेत विहार परिसरामध्ये राहतो. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता तो व त्याचे वडील येथे कार पार्किंग करीत होते. त्यावेळी घडई व त्याच्या वडिलांची तेथील पाच जणांबरोबर भांडणे झाली.

त्यानंतर पाच जणांनी त्यांच्या आणखी 15 साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर 15 ते 20 जणांच्या टोळक्‍याने फिर्यादी राहूल घडई यांना लाकडी दांडक्‍याते जबर मारहाण केली. तसेच, त्याच्या डोक्‍यात कोयत्याने वार केले. फिर्यादी रक्ताच्या थारोळ्यात पडले, त्यानंतरही आरोपींनी फिर्यादीच्या डोक्‍यात दगड घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, फिर्यादीच्या मदतीसाठी येणाऱ्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून आरोपींनी दहशत निर्माण केली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com