सिगारेट उशिरा दिल्याच्या कारणावरून घराची तोडफोड

संदीप घिसे
बुधवार, 2 मे 2018

संदीप साहेबराव खैरनार (वय २३), जुबेर नासीर शेख (वय २१, दोघेही रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. इतर चारजण पळून गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पिंपरी : दुकानदाराने सिगारेट उशिरा दिल्याच्या कारणावरून एका टोळक्याने दुकानदारांच्या घराची तोडफोड करीत गल्ल्यातील पैसे लुटले. ही घटना सोमवारी (ता.३०) सकाळी दहा वाजता निगडी येथे घडली.

संदीप साहेबराव खैरनार (वय २३), जुबेर नासीर शेख (वय २१, दोघेही रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. इतर चारजण पळून गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मोहिनी अशोक भोसले (वय३६) यांनी निगडी पोलीस ठाण्यात दरोड्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले यांचा संघमित्र हाऊसिंग सोसायटी, ओटा स्कीम, निगडी, येथे  गोळ्या बिस्कीट विक्रीचा व्यवसाय आहे.

आरोपींनी त्यांच्याकडे सिगारेट मागितली. ती उशिराने दिल्याच्या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यावेळी मोहिनी यांचा मुलगा प्रशांत हा आरोपींना समजावून सांगण्यासाठी गेला असता, त्यास 'हातपाय तोडेल' अशी धमकी देऊन घरात घुसले. घरातील दरवाजावर कोयत्याने मारून खिडकीच्या काचाही फोडल्या तसेच इतर वस्तूंची तोडफोड केली. दुकानाच्या गल्ल्यातील साडेचारशे रुपये जबरदस्तीने चोरून नेले. सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण याबाबत तपास करीत आहेत.

Web Title: mob attacked shop keeper in Pimpri