मोबाईल कलचाचणी विद्यार्थ्यांसाठी त्रासाची

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पिंपरी - शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी असूनही यावर्षी संगणकाऐवजी मोबाईल ॲपवर कलचाचणी घेण्यात येत आहे. पुरेशा मोबाईल अभावी ही चाचणी घेण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांना मोबाईलवर ही परीक्षा देणे त्रासदायक ठरत आहे. 

पिंपरी - शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी असूनही यावर्षी संगणकाऐवजी मोबाईल ॲपवर कलचाचणी घेण्यात येत आहे. पुरेशा मोबाईल अभावी ही चाचणी घेण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांना मोबाईलवर ही परीक्षा देणे त्रासदायक ठरत आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे ३०० शाळा आहेत. त्यातील सुमारे २१ हजार मुले कलचाचणी देत आहेत. मंगळवारपासून (१८ डिसेंबर) या चाचणीस सुरवात झाली आहे. १७ जानेवारी २०१९ पर्यंत ती होणार आहे. सलग तीन वर्षांपासून संगणकावर कलचाचणी घेण्यात येत होती. त्या वेळी प्रत्येक शाळेतून दिवसाला १० मुले चाचणी देत होते. मात्र, यावर्षी श्‍यामची आई फाउंडेशन ही संस्था मोबाईल ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कलचाचणी घेत आहे. शाळेतील तुकड्यांवर मोबाईलची संख्या अवलंबून असल्याने यावर्षी ती संख्या गाठणे साध्य होत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

प्रत्येक शाळेत सुमारे २०० ते ३०० दहावीचे विद्यार्थी आहेत. मोबाईलवरून कल चाचणी घेण्यासाठी प्रत्येक मुलाला दीडतास लागतो. त्यामुळे पाच तासांच्या शाळेत दिवसभरात किमान ३ ते ४  मुलेच परीक्षा देऊ शकत आहेत. दरम्यान, कलचाचणीसाठी २०० प्रश्‍न आहेत. वेगवेगळ्या आकृत्या, संदर्भासहित स्पष्टीकरणाचे मोठे प्रश्‍न आहेत. अक्षर बारीक असून, ते झूम करून पाहावे लागत असल्याने ही चाचणी त्रासदायक ठरत आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 

पर्सनल डाटा डिलीट झाला तर...?
मोबाईल ॲपद्वारे परीक्षा घेण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिक्षकांना त्यांच्या मोबाईलवर ही परीक्षा घेण्याचे सांगितले आहे; पण अनवधानाने पर्सनल डाटा डिलीट झाला तर अडचण  होईल, अशी भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे. 

संगणकीय परीक्षा पद्धत बरी होती. मोबाईल ॲपवर परीक्षा देणे त्रासदायक आहे. ही वेळखाऊ प्रक्रिया आहे.
- नीलेश गायकवाड, मुख्याध्यापक, जिजामाता माध्यमिक विद्यालय

Web Title: Mobile Test Student Troubles