पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवादी...नव्हे ‘मॉक ड्रील’

‘जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवादी घुसले आहेत’,
mock drill for Terrorist attack in Collector office pune
mock drill for Terrorist attack in Collector office pune sakal

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी मोठा आवाज झाला...पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून ६ वाजून ५५ वाजता दूरध्वनी जातो...अधूनमधून आवाज येतच असतात...कर्मचारीही काहीशा भीती आणि उत्सुकतेने विचारणा करीत असतात...काहीवेळाने जिल्हाधिकारी आल्यानंतर सुरक्षा प्रात्यक्षिक (मॉक ड्रील) यशस्वीपणे पार पडल्याचे लक्षात येते.

‘जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवादी घुसले आहेत’, असे जिल्हाधिकारी कार्यालयातून नियंत्रण कक्षात कळविण्यात आले. त्यानंतर तातडीने राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, बॉम्बशोधक पथक, राज्य राखीव दल, जलद प्रतिसाद दल आणि सुरक्षा दल यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर राज्य राखीव दल आणि बंडगार्डन पोलिस ठाण्यातील पोलिसांमार्फत मोकळा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाचा नकाशा आणि परिसराचा अभ्यास करून राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे दोन पथक आणि जलद प्रतिसाद दलाच्या जवानांनी कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजला आणि चौथ्या मजल्यावर अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘मॉक ड्रील’ पूर्ण झाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली. कर्नल नितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘मॉक ड्रील’मध्ये आरोग्य विभाग, महापालिका, अग्निशमन दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com