आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार

दत्ता म्हसकर
गुरुवार, 24 मे 2018

जुन्नर (पुणे) : कृषी विभागाच्या 'उन्नत शेती-समृद्ध शेतकरी' पंधरवड्यास आज गुरुवार (ता.24) पासून प्रारंभ होत असून या कालावधीत सर्व सामान्य शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार असल्याचे सहाय्यक तालुका कृषी अधिकारी बापू रोकडे यांनी सांगितले.

खरीप व रब्बी हंगामात ही मोहिम राबविण्यात येत आहे. या वर्षी 24 मे ते 7 जून या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या पंधरवड्यात कृषीच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा पद्धती,पीक विमा संरक्षण,एकात्मिक शेती,आंतरपीक पद्धती,शेतकरी अपघात विमा आदी बाबत गावोगावी जनजागृती करण्यात येणार आहे.

विविध कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी,जलयुक्त शिवार अभियानातील जलसाठ्याचा संरक्षीत सिंचनासाठी वापर,कीड कीटक नाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी,शेतीमालावर प्राथमिक प्रक्रिया आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

सरकारच्या विविध विभागाच्या सहकार्याने गावपातळीवर हे उपक्रम राबविले जाणार असून या पंधरवड्यात आयोजित चर्चा सत्र,बैठका,कार्यशाळा,विविध कार्यक्रम याचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Web Title: modern agriculture technique reaches to common man