मोहन जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे - क्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानतर्फे हरिभाऊ साने यांच्या स्मृतिदिनी दिला जाणारा कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. गायिका सावनी शेंडे-साठ्ये यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल, तर राहुल आवारे यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल क्रीडामहर्षी हरिभाऊ साने पुरस्कार दिला जाणार आहे. येत्या रविवारी (ता. 5) पुरस्कारांचे वितरण होणार आहे. "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार, पालकमंत्री गिरीश बापट आणि डॉ. उदय निरगुडकर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता एस. एम.

पुणे - क्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानतर्फे हरिभाऊ साने यांच्या स्मृतिदिनी दिला जाणारा कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. गायिका सावनी शेंडे-साठ्ये यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल, तर राहुल आवारे यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल क्रीडामहर्षी हरिभाऊ साने पुरस्कार दिला जाणार आहे. येत्या रविवारी (ता. 5) पुरस्कारांचे वितरण होणार आहे. "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार, पालकमंत्री गिरीश बापट आणि डॉ. उदय निरगुडकर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता एस. एम. जोशी सभागृहात होईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ साने यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे. 

Web Title: Mohan Joshi declared Lifetime Achievement Award