इंदापूरमध्ये मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र साजरा

डॉ. संदेश शहा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

इंदापूर : येथील शास्त्री चौकातील नवजवान मित्र मंडळ तसेच शेख मोहल्ला मोहरम कमिटीच्या वतीने एकत्रित गणेशोत्सव तसेच ताबूत साजरा करण्यात आला. हे सण ३२ वर्षानंतर एकत्र आले त्यामुळे दोन्ही महोत्सव एकत्र साजरे करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. बारामती अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदिप पखाले, पोलीस निरीक्षक मधुकर पवार, श्री. गोडसे यांनी मंडळ व कमिटीस भेट देवून आनंद व्यक्त केला. यानिमित्त कामधेनू सेवा परिवाराचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आसबे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील मुस्लीमांचे योगदान या विषयावर दिले. 

यावेळी डॉ. संदिप पखाले म्हणाले, गणेशोत्सव मंडळ तसेच मोहरम कमिटीने दोन्ही उत्सव एकत्रित साजरे करून राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आहे. इंदापूरचा हा आदर्श संपुर्ण राज्यास दिशादर्शक आहे. या उपक्रमामुळे जातीय सलोखा वृध्दींगत झाला असून हा उपक्रम स्तुत्य आहे. प्रदिप गारटकर म्हणाले, सण आणि उत्सव ही भारतीय संस्कृतीची चैतन्यप्रतीक आहेत. हिंदू व मुस्लिम हे भारतीय संस्कृतीचे महत्वपुर्ण घटक असून देश बलवान करण्यासाठी सर्वांनी एकत्रित चैतन्यमय उपक्रम साजरे करणे गरजेचे आहे. आमची रोजा इफ्तार पार्टी एकत्रित 
साजरी करण्याची परंपरा आहे.

डॉ. लक्ष्मण आसबे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तसेच त्यांचे वडिल छत्रपती शहाजीराजे यांच्या जहागिरीचे हे शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्रमप्रतिष्ठा व प्रामाणिकपणास महत्व देवून सर्व जातीधर्मातील निष्ठावान मावळे स्वराज्यासाठी निर्माण केले. त्यामध्ये मुस्लिमांचे देखील योगदान महत्वपुर्ण आहे.

नवजवान मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज घोलप, उपाध्यक्ष देवीदास राहिगुडे, शेख मोहल्ला मोहरम कमिटीचे अध्यक्ष अय्याज शेख, उपाध्यक्ष नईम शेख, प्रसाद गारटकर, मनोज पवार, विकास पलंगे, कैलास कोतमिरे, गणेश सणगर यांनी कार्यक्रम यशश्वतेसाठी प्रयत्न केले.
 
Web Title: Moharam and Ganeshotsav celebrated together in Indapur