दीड महिन्यानंतरही ऊसदराची कोंडी कायम; शिवसेनेचं साखर आयुक्तालयासमोर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 December 2020

सोलापूर जिल्ह्यात 60 लाख मेट्रिक टन ऊस गाळप केला जातो. परंतु कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही.

पुणे : गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना लोटून गेला तरी ऊसदराची कोंडी फोडली जात नाही. यासाठी येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर मोहोळ तालुक्‍यातील (जि. सोलापूर) शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 

IAS अधिकाऱ्यानं सुचवला रामबाण उपाय, 'शेतकऱ्यांचं आंदोलन थांबवायचंय तर...'

सोलापूर जिल्ह्यात 60 लाख मेट्रिक टन ऊस गाळप केला जातो. परंतु कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही. पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील साखर कारखाने ऊसाला एफआरपीनुसार चांगला भाव देत आहेत. परंतु सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार ऊस गाळपास नेत आहेत परंतु दर जाहीर करीत नाहीत. साखर आयुक्‍तांनी याची गंभीर दखल घेत त्यात हस्तक्षेप करावा, यासाठी आंदोलन करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे युवा नेते नागेश वनकळसे यांनी दिली. 

IIT मद्रास लॉकडाउन; १०० जणांना कोरोनाची बाधा झाल्याने सर्व विभाग बंद!

साखर कारखान्यांनी महसुली उत्पन्नाच्या 70 टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी. ऊस कारखान्यावर गाळपासाठी गेल्यानंतर 14 दिवसांत ऊस बिल द्यावे.कारखान्याच्या साखरेचा उतारा तपासणीसाठी सरकारी प्रतिनिधी नेमावेत. जिल्ह्यातील बरेच कारखाने कामगारांचे वेतन थकवीत आहेत ते तात्काळ द्यावे. शेतकऱ्यांची गेल्या दोन वर्षांपासूनची ऊस बिले द्यावीत. साखर कारखान्यांचे ऊस वजन काटे ऑनलाइन करावेत अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. 

Maratha Reservation: मराठा समाजाला OBC कोट्यातून आरक्षण द्या; संभाजी ब्रिगेडची मागणी​

या आंदोलनात शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक भोसले, उपतालुका प्रमुख बाळासाहेब वाघमोडे, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख हर्षल देशमुख, अभिजित भोसले, गणेश लाखदिवे, प्रीतम सुतार यांच्यासह अन्य शिवसैनिक सहभागी झाले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohol taluka Shiv Sena staged protest in front of Sugar Commissioner office