Mokka Crime : कात्रजमधील गुन्हेगारी टोळीवर ‘मोका’

कात्रज भागात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली.
Mokka crime
Mokka crimeSakal
Summary

कात्रज भागात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली.

पुणे - कात्रज भागात दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबत आदेश दिले.

कात्रज भागात एका रिक्षाचालकावर बागवान आणि त्याच्या साथीदारांनी हत्याराने वार केले होते. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Mokka crime
Atal Bhujal Yojana : देशातील १३५ अधिकाऱ्यांनी गिरवले भूजल संवर्धनाचे धडे

टोळीप्रमुख साकिब मेहबूब चौधरी ऊर्फ लतीफ बागवान (वय २३), रेहान सीमा शेख ऊर्फ रेहान दिनेश शेख (वय १९), अब्दुलअली जमालउद्दीन सय्यद (वय १९), संकेत किशोर चव्हाण (वय १८), ऋतिक चंद्रकांत काची (वय २१, सर्व रा. कात्रज) आणि एक अल्पवयीन मुलासह ११ जणांविरुद्ध मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपी रेहान शेख, अब्दुल अली सय्यद, संकेत चव्हाण आणि ऋतिक काची यांना अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com