जितेंद्र जगताप हत्येप्रकरणी दीपक मानकर यांच्यावरील मोक्का रद्द

Deepak-Manakar.jpg
Deepak-Manakar.jpg

पुणे : सामाजिक कार्यकरर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी उपमहापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावरील मोक्का उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे आता त्यांना जामीन मिळण्याची शक्‍यता आहे.

मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जगताप यांनी दोन जून 2018 साली घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद रमेश भोळे (वय 34, रा जोशी वाडी, घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रेय सुतार (वय 30,रा जयभवानी नगर, कोथरूड), अमित उत्तम तनपुरे (वय 28, रा मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय 36 ) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय 30, रा शांतिनगर येरवडा), कुख्यात गुंड नाना कुदळे (रा. केळेवाडी) आणि अजय कंधारे यांना अटक केली होती. 

उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मानकर पोलिसांत हजर झाले होते. या प्रकरणात दोषारोपपत्र देखील दाखल आहे. तब्येत खराब झाल्यामुळे त्यांच्यावर काही दिवस खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला होता. 

दरम्यानच्या काळात मानकर यांच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मानकरांवर मोक्कानुसार कारवाई करण्याची परवानगी देताना त्यांच्यावर 14 ऐवजी आठच गुन्हे असल्याबाबतचा अहवाल दिल्याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त व सध्याचे मुंबई रेल्वे आयुक्त रवींद्र सेनगावकर यांची चौकशी करण्याचे आदेश नुकतेच विशेष मोक्का न्यायालयाने दिले आहेत. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता केतन तिरोडकर (रा. अशोक पाथ, लॉ कॉलेज रोड) यांनी सेनगावकर, दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. आठच गुन्हे असल्याचे दाखवत मोक्का लावण्यात आला. उर्वरित सहा गुन्ह्यांबाबत माहिती न दिल्याने खटला कमकुवत झाल्याचा आरोप याचिकेमार्फत करण्यात आला होता आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com