जुनी सांगवीत चेंबर तुंबल्याने मैलामिश्रित घाण पाणी रस्त्यावर

रमेश मोरे
सोमवार, 11 जून 2018

जुनी सांगवी -  येथील मुळानदी किनारा रस्त्यावर ढोरेनगर येथील ड्रेनेज लाईन चेंबर तुंबल्याने गेल्या पाच दिवसापासुन मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे येथील दोनशे मिटर परिसरात घाण पाणी साचत आहे. 

जुनी सांगवी -  येथील मुळानदी किनारा रस्त्यावर ढोरेनगर येथील ड्रेनेज लाईन चेंबर तुंबल्याने गेल्या पाच दिवसापासुन मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे येथील दोनशे मिटर परिसरात घाण पाणी साचत आहे. 

येथील रस्ता सखल खड्डेमय असल्याने पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने या परिसराला पाणी साचुन तळ्याचे स्वरूप येते. गेल्या पाच दिवसापासुन येथील चेंबर मधुन ओव्हरफ्लो झाल्याने घाण पाणी गतिरोधकला साचुन राहात आहे. नागरीकांना यातुनच रहदारी करावी लागत आहे. पावसाच्या पाण्यात नेहमी येथील चेंबर ओव्हरफ्लो होते. पावसाच्या पाण्यासोबत मैलामिश्रितपाणी रस्त्सावर येते. येथील रहिवाशांना घाण पाण्यातुनच रहदारी बरोबरच दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. 

या घाण पाण्यातुन ये जा करताना अनेकदा पादचारी नागरीकांच्या अंगावर वहानांकडुन पाणी उडाल्याने येथे वादावादीचे प्रकारही घडले आहेत. या रस्त्यावर एक शाळा, उद्यान आहे. तर औंध पुण्याकडे जाण्यासाठी या रस्त्याचा सांगवी व परिसरातील नागरीकांकडुन मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. दुर्गंधीयुक्त वासाचा त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. येथील चेंबरदुरूस्ती करून येथे कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी नागरीकांकडुन मागणी होत आहे. 

संबंधित विभागाला येथील चेंबरदुरूस्ती काम तात्काळ करण्याबाबत सांगितले आहे. 
संतोष कांबळे, नगरसेवक

Web Title: Molassy dirt on the water road due to chamber overflow