पिंपरी : संगणक अभियंता तरूणीचा विनयभंग

संदीप घिसे 
सोमवार, 3 डिसेंबर 2018

गेल्या पाच महिन्यापासून कपिल त्या तरूणीचा पाठलाग करीत असे. तिला व तिच्या होणाऱ्या पतीला वारंवार फोन करून आणि मेसेज करून फिर्यादी तरूणी व आपले प्रेमसंबध असल्याचे खोटं सांगून लग्न मोडण्याची धमकी दिली. सहायक निरीक्षक आनंद पगारे याबाबत अधिक तपास करीत आहे.

पिंपरी (पुणे) : आयटी कंपनीत कामाला असलेल्या एका संगणक अभियंता तरूणीचा तिच्या मित्राने विनयभंग केला. ही घटना हिंजवडी येथे घडली.

कपिल जोहरी (रा. बाणेर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी संगणक अभियंत्याचे नाव आहे. याबाबत २६ वर्षीय तरूणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी आणि आरोपी कपिल हे दोघे मित्र असून पूर्वी एकाच कंपनीत कामाला होते. कपिल याला फिर्यादी तरूणीशी लग्न करायचे होते. मात्र फिर्यादीने त्यास नकार दिला. 

गेल्या पाच महिन्यापासून कपिल त्या तरूणीचा पाठलाग करीत असे. तिला व तिच्या होणाऱ्या पतीला वारंवार फोन करून आणि मेसेज करून फिर्यादी तरूणी व आपले प्रेमसंबध असल्याचे खोटं सांगून लग्न मोडण्याची धमकी दिली. सहायक निरीक्षक आनंद पगारे याबाबत अधिक तपास करीत आहे.

Web Title: molestation of computer engineer girl in Pimpri