तळेगावसह मावळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेश बोरुडे
गुरुवार, 26 जुलै 2018

तळेगाव स्टेशन - मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या मावळ बंदला तळेगाव दाभाडे शहरासह एमआयडीसी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर परिसरातून जाणार्या दोन्ही महामार्गावर तुरळक वाहने वगळता शुकशुकाट होता.

तळेगाव स्टेशन - मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या मावळ बंदला तळेगाव दाभाडे शहरासह एमआयडीसी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर परिसरातून जाणार्या दोन्ही महामार्गावर तुरळक वाहने वगळता शुकशुकाट होता.

सकल मराठा समाजातर्फे आयोजित बंदच्या पार्श्वभूमीवर अपवाद वगळता तळेगाव दाभाडे शहरातील बहुतांशी शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आले होते.तरुणांनी शहरातून झेंडे हातात घेऊन "एक मराठा लाख मराठा" घोषणा देत मोटारसायकल रॅली  काढत बंदचे आवाहन केले.रॅलीतील युवकांनी दुपारी  तळेगाव-चाकण महामार्गावर ठिय्या मांडल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी झाली.बंदचे आवाहन करुनही भरलेल्या शाळा त्यानंतर मधूनच सोडून देण्यात आल्या. तळेगाव दाभाडे गावठाण,बाजारपेठ, जिजामाता चौक, लिंब फाटा, स्टेशन रोड, चाकण रोड, यशवंतनगर, छतपती शिवाजी महाराज चौक, मनोहरनगर, माळवाडीसह संपुर्ण शहरभर बँका, दवाखाने, मेडिकल आदी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि व्यवहार बंद होते. स्टेशनची भाजी मंडई पुर्णपणे बंद होती.मालवाहतुकीची वाहने तसेच रिक्षाचालकांनी देखील वाहने बंद ठेऊन संपाला पाठींबा दिला. एरव्ही गजबजलेल रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट होता. संपाला स्वयंस्फुर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.चौकाचौकात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

तळेगाव एमआयडीसीही कडकडीत बंद पाळला गेला.एरव्ही गजबजलेल्या तळेगाव एमआयडीसी परिसरात कडकडीत बंदमुळे दुपारनंतर पुर्णपणे शुकशुकाट झाला. तळेगाव एसटी आगारातून सकाळी लवकर सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही वगळता, स्थानिक आणि मावळ तालुक्यातील सर्व फेर्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.

Web Title: Molval Bandla with Talegaon got a spontaneous response