पैशापेक्षा चारित्र्य महत्त्वाचे - जोशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

कोथरूड - शिक्षण आणि पैसा यापेक्षा चारित्र्य अधिक महत्त्वाचे आहे. हे ज्यांनी सांभाळले, तोच खरा मनुष्य आहे. प्रत्येकाने शिक्षण, अर्थकारण आणि राजकारण या तिन्ही गोष्टी सांभाळून आपली वाटचाल करावी, असा सल्ला लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांनी दिला.

माईर्स एमआयटीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड होते. 

या प्रसंगी माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्‍वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आय. के. भट, माईर्स एमआयटीच्या विश्‍वस्त व कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागारे, एमआयटीचे कुलसचिव नाना कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर व प्रा. डी. पी. आपटे उपस्थित होते.

जोशी म्हणाले, ‘‘ध्येय मोठे असेल, तर यश आपोआप मिळते. शैक्षणिक क्षेत्र हे पवित्र क्षेत्र असल्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी. इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर व्यक्ती यश खेचून आणू शकते.’’

Web Title: money Character is important than money manohar joshi