पैशांसाठी विवाहितेला ठेवले उपाशी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पिंपरी : माहेराहून दोन लाख रुपये व दोन तोळे सोने आणण्याच्या कारणावरून विवाहितेला उपाशी ठेवून तिचा छळ केल्याची घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.
 

पिंपरी : माहेराहून दोन लाख रुपये व दोन तोळे सोने आणण्याच्या कारणावरून विवाहितेला उपाशी ठेवून तिचा छळ केल्याची घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.
 
या प्रकरणी शोभा सचिन राजगुरू (वय 23 रा. भोसरी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सासू सुमन राजगुरू, सासरे तुकाराम राजगुरू, पती राजगुरू, मावस सासू शीतल वाघमारे, दीर सोन्या राजगुरू, नणंद पूजा कांबळे, कांचन चौबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या लग्नाच्या सहा महिन्यानंतर सासरकडील मंडळींनी आपसात संगनमत करून तिचा छळ करण्यास सुरवात केली. तू चांगली दिसत नाहीस, असे वारंवार हिणविण्यात आले. तसेच नणंदेच्या सांगण्यावरून माहेराहून दोन लाख रुपये व दोन तोळे सोने घेऊन ये म्हणून त्रास देण्यास सुरवात केली. तिला शिवीगाळ व मारहाण करून उपाशी ठेवत तिचा छळ केला. 
 

Web Title: for money they keep newly married daughter in law hungry