मॉन्सून कर्नाटकात दाखल 

मॉन्सून कर्नाटकात दाखल 

पुणे - अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर मॉन्सूनचा प्रवास शुक्रवार(ता. 14)पासून पुन्हा सुरू झाला. तो आता दक्षिण कर्नाटकात दाखल झाला आहे. 

"वायू' चक्रीवादळामुळे गेल्या मंगळवारपासून मॉन्सूनचा प्रवास थांबलेला होता. कन्नूरपर्यंत पोचल्यानंतर मॉन्सूनने चार दिवस विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता मॉन्सूनने कर्नाटकातील मंगळूर, म्हैसूरपर्यंत मजल मारली आहे, तर तमिळनाडूतील सालेम, कुड्डालोरपर्यंत प्रगती आहे. ईशान्य भारतात आणखी वाटचाल करताना त्रिपुरा, असाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांत मॉन्सून पोचल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपट्टीवर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण तयार होत असल्याने कर्नाटक, तमिळनाडूच्या आणखी काही भागांसह मध्य अरबी समुद्रात मॉन्सूनची प्रगती शक्‍य आहे. तर बंगालच्या उपसागरावरूनही मॉन्सून पुढे चाल करणार असून, रविवार(ता. 16)पर्यंत सिक्कीम आणि पश्‍चिम बंगालच्या उत्तर भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

दरम्यान, मॉन्सूनची वाटचाल यंदा खूपच अडखळत सुरू आहे. आगमनास प्रतिकूल स्थिती असल्याने यंदा केरळात नियमित वेळेच्या तब्बल आठवडाभर उशिराने मॉन्सून डेरेदाखल झाला. केरळच्या कोचीसह तमिळनाडूच्या मदुराईपर्यंत मजल मारली. पुढील दोन दिवसांत आणखी प्रगती करत कन्नूरपर्यंतचा टप्पा पूर्ण करून, केरळचा बहुतांशी भाग व्यापला होता. मॉन्सून साधारणतः 13 जूनपर्यंत महाराष्ट्रात पोचण्याची शक्‍यता असतानाच अरबी समुद्रात "वायू' चक्रीवादळ तयार झाले. "वायू'मुळे मॉन्सूनची वाटचाल थांबली. तसेच समुद्रावरील बाष्प ओढून घेतल्याने मॉन्सूनचे राज्यातील आगमनही लांबले. "वायू' चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असल्याने मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com