गडद निळे जलद भरुनी आले; पुण्यात मॉन्सून आला!!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

पुणे - बहुप्रतीक्षित "मॉन्सून'चे आज (सोमवार) पुण्यामध्ये सुखद आगमन झाले. मॉन्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर रिमझिम पाऊस सुरु झाल्यामुळे सुखावलेल्या पुणेकरांनी या मॉन्सूनचे मनापासून स्वागत केले.

अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली; तर लहान मुलांनी भिजण्याची संधी साधून घेतली! शहरात सर्वदूर झालेला हा पाऊस मॉन्सूनच असल्याच्या अंदाजास वेधशाळेनेही पुष्टी दिली आहे.

बंगालच्या उपसागराच्या परिसरात कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती तयार झाली आहे. येत्या ४८ तासामध्ये स्थितीचे रूंपातर चक्राकार वाऱ्यामध्ये होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील राजस्थानच्या उत्तर भाग ते अंदमान समुद्राच्या उत्तर भागादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल या भागात व्यापेल. ही स्थिती समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर असेल. पाकिस्तानच्या मध्य ते राजस्थानचा पश्चिम भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर तसेच मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भाग ते केरळचा उत्तर भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र हळूहळू  केरळकडून महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे.

Web Title: Monsoon arrives in Pune