मध्य, पूर्व भागातून मॉन्सूनची माघार

मध्य, पूर्व भागातून मॉन्सूनची माघार

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. शनिवारी (ता.१२) गुजरात, मध्य प्रदेशचा बहुतांशी भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहारच्या काही भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतला. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात मॉन्सूनच्या परतीला पोषक हवामान असल्याने या भागातून मॉन्सून परतणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

बुधवारी (ता.९) माघारी फिरलेला मॉन्सून चारच दिवसांत देशाच्या अनेक भागातून परतला आहे. शक्रवारी (ता. ११) उत्तर भारतातून पूर्णपणे माघारी फिरलेल्या मॉन्सूनने शनिवारी (ता. १२) मध्य आणि पूर्व भारतातील राज्यासह अरबी समुद्रातील काही भागांतील मुक्काम हलविला आहे. परतीच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने सोमवारपर्यंत (ता.१३) मध्य, पूर्व भारतातील बुहतांशी भाग, ईशान्य भारतातील काही भागातून मॉन्सून परतणार आहे.

हलक्या पावसाची शक्यता
राज्याच्या दक्षिण भागात असलेल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये मात्र वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे. राज्यात शुक्रवारपासून (ता. ११) वादळी पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे. उद्या (ता. १३) कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com