महिनाभराचा पाणीसाठा फक्त 11 तासात वाढला

राजेंद्रकृष्ण कापसे
शनिवार, 27 जुलै 2019

खडकवासला : धरण साखळी क्षेत्रात शनिवारी सकाळी सहा वाजता 16.74 टीएमसी पाणीसाठा होता तो आज संध्याकाळी सहा वाजता 18.10 टीएमसी पाणीसाठा झाला आहे म्हणजे 11 तासात सुमारे दीड टीएमसीची वाढ झाली. दिवसभरात महिनाभर पुरेल एवढे पाणीसाठा जमा झाले आहे.

चार धरण क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी सहा ते संध्याकाळी पाच वाजता मागील 11 तासातील पाऊस (मिलीमीटर मध्ये) खडकवासला35, पानशेत 80, वरसगाव 85, टेमघर 80 पडला आहे. 

खडकवासला धरणात 1.73 टीएमसी म्हणजे 87.75 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. कालव्यातुन 1005 क्यूसेक पाणी सोडले आहे. पानशेत धरणात 7.36 टीएमसी म्हणजे  69.13 टक्के पाणीसाठा झाला आहे.

वरसगाव धरणात 7.20 टीएमसी 56.15 टक्के पाणीसाठा झाला आहे. टेमघर धरणात 1.81 टीएमसी म्हणजे 48.90 पाणीसाठा जमा झाला आहे. चार धरणात मिळून 18.10 टीएमसी म्हणजे 62.11 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The month-long water storage increased by in only 11 hours In pune