आता लग्न आणि जन्माचा दरमहा वाढदिवस!

जन्माचा असो किंवा लग्नाचा वाढदिवस तो साजरा करायचा म्हटले की, वर्षपूर्ती झाल्यानंतरच, अशी पद्धत आजपर्यंत सुरू होती.
Birthday
BirthdaySakal
Summary

जन्माचा असो किंवा लग्नाचा वाढदिवस तो साजरा करायचा म्हटले की, वर्षपूर्ती झाल्यानंतरच, अशी पद्धत आजपर्यंत सुरू होती.

पुणे - जन्माचा असो किंवा लग्नाचा वाढदिवस तो साजरा करायचा म्हटले की, वर्षपूर्ती झाल्यानंतरच, अशी पद्धत आजपर्यंत सुरू होती. पण, हल्ली ‘वन मंथ सेलिब्रेशन’ची अनोखी क्रेझ वाढली आहे. हा ट्रेंड सध्या जवळपास सर्वंच घरापर्यंत पोचला आहे. बाळाला एक महिना झालेला असो किंवा लग्नाला, प्रत्येक महिन्याला सेलिब्रेशन हे जोरात होणार असं अनेकांच्या घरात ठरलेलं आहे.

छोटे-छोटे निमित्त साजरे करण्याचे प्रमाण गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोरोना काळात या अशा सेलिब्रेशनला आणखी खत-पाणी मिळाले. त्यामुळे आता वन मंथ किंवा लहान मुलांचा १२ व्या महिन्यापर्यंतचा प्रत्येक महिना सेलिब्रेट करण्याचा ट्रेन्ड रुजू झाला आहे. ज्या जोडप्यांचे प्री वेडिंग राहिले आहे, असे काही हौसे जोडपे या निमित्ताने पुन्हा एकदा फोटोसेशनची हौस भागवत आहे. यातून फोटोग्राफर आणि केक विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहे.

आमच्या लग्नाला नुकताच एक महिना झाला. त्यानिमित्ताने आम्ही आमची ‘वन मंथ ॲनिव्हर्सरी’ गोव्यात साजरी केली. या छोट्या छोट्या सेलिब्रेशनमुळे एक वेगळाच आनंद मिळतो. सोशल मीडियामुळे हा ट्रेंड आपणही फॉलो करायचा असे ठरविले. प्रत्येक महिन्याला असा आनंदोत्सव साजरा केल्याने हे नव्याने तयार झालेले नाते अधिक घट्ट होईल असे आम्हाला वाटते.

- अंकिता आणि आलोक महाडिक, नुकतेच लग्न झालेले जोडपे

समाज माध्यमाचा प्रभाव

  • सोशल मीडियावरही अशा प्रकारच्या सेलिब्रेशनसाठी फोटो कॅप्शन

  • व्हिडिओ आणि उपहारांचे पर्याय उपलब्ध

  • थीमवर आधारित डेकोरेशन केले जात आहे

  • मुलांच्या कपड्यांवर दिले जातेय विशेष लक्ष

  • काहीतरी भन्नाट करण्याची संकल्पना

बाळांचे हटके पद्धतीने कौतुक

आपल्या मुला-बाळासाठी आगळ्या वेगळ्या वस्तू घेण्यापासून ते त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी पालकांद्वारे केली जाणारी धावपळ दैनंदिन जीवनात आपण पाहत असतो. मात्र, सध्याचे पालकही हौशी झाले आहेत. बाळ जन्माला आल्‍यावर त्याच्या गृह प्रवेशासोबतच प्रत्येक महिन्याला त्याचा वाढदिवस साजरा करणारे पालक प्रत्येक महिन्याला आपल्या बाळाचा वाढदिवस एकदम हटके पद्धतीने करत आहेत. यामध्ये प्रत्येक महिन्याला नवीन थीम ठरवत फोटोशूट, केक अशा पद्धतीने मंथली बर्थडे साजरा केला जातो. तसेच फळे, फुले, अंक, खेळणी, कपडे, बाळाच्या वापरण्याजोगी वस्तू अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करत बाळ किती महिन्याचे झाले याचा आकडा तयार करणे व त्यांचे भन्नाट फोटो काढत सोशल मीडियावर अपलोड करणे. ही अलीकडच्या काळातील पालकांची क्रेझ.

मी अनेक वर्षांपासून बेकरी अँड केक बेकिंगचा घरगुती व्यवसाय करत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये मंथली बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा ट्रेंड चांगलाच जोर धरत आहे. हल्ली हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता प्रत्येक महिन्याला अशा कारणांमुळे केक घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. इतकंच नाही तर प्रत्येकवेळी नव्या थीमसह केकची ऑर्डर दिली जाते.

- सारिका होळकर, बेकरी व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com