पिंपळे गुरव येथील जेष्ठनागरिक संघाची मासिक सभा संपन्न

मिलिंद संधान
रविवार, 24 जून 2018

नवी सांगवी ( पुणे) : पिंपळे गुरव येथील भैरवनाथ जेष्ठनागरिक संघाची मासिक सभा आज रविवार रोजी पार पडली. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांच्या हस्ते जुन महिण्यात वाढदिवस असणाऱ्या १४८ सभासदांचे सत्कार करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष रामचंद्र कदम, उपाध्यक्ष बबनराव रावडे, सचिव जालंदर दाते, कोषाध्यक्ष नागनाथ निळेकर, माजी अध्यक्ष मधुकर नवले यांच्यासह कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष पवार म्हणाले, " कुटूंब व्यवस्थेचा आधारवड असणारे जेष्ठनागरिक विरंगुळा केंद्रात एकत्रीत होताना सामाजिक कार्यात रस घेऊन सामाजिक बांधिलकी जपत आहे. त्यामुळे स्वतःचे स्वास्थ जपत असताना समाजातील एकसंघपणा अबाधित ठेवत आहेत. " कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कार्याध्यक्ष मल्हारराव येळवे यांनी केले तर आभार प्रकाश बंडेवार यांनी मानले.

Web Title: monthly meeting of the senior citizens of Pimpale Gurav

टॅग्स