मोरया गोसावी समाधी महोत्सव शनिवारपासून

सकाळ वृत्तसेवा
04.01 AM

श्री मोरया गोसावी यांचा ४५८ वा संजीवन समाधी महोत्सव ७ ते १७ डिसेंबर या कालावधीत चिंचवड येथे होणार आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त मंदार महाराज देव यांनी याबाबत माहिती दिली. विश्‍वस्त विश्राम देव, आनंद तांबे, विनोद पवार, नगरसेविका अपर्णा डोके, अश्‍विनी चिंचवडे, करुणा चिंचवडे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मोरेश्‍वर शेडगे उपस्थित होते.

पिंपरी - श्री मोरया गोसावी यांचा ४५८ वा संजीवन समाधी महोत्सव ७ ते १७ डिसेंबर या कालावधीत चिंचवड येथे होणार आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त मंदार महाराज देव यांनी याबाबत माहिती दिली. विश्‍वस्त विश्राम देव, आनंद तांबे, विनोद पवार, नगरसेविका अपर्णा डोके, अश्‍विनी चिंचवडे, करुणा चिंचवडे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मोरेश्‍वर शेडगे उपस्थित होते.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

महोत्सवाचे उद्‌घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते शनिवारी (ता. ७) सायंकाळी साडेपाच वाजता होईल. महोत्सवात १३ डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी नऊ ते ११ या वेळेत श्री मोरया गोसावी चरित्रपठण तसेच सामुदायिक योगासनवर्ग, भजन, कीर्तन, शास्त्रीय आणि दंत आणि नेत्र चिकित्सा शिबिर, माफक दरात चष्मे वाटप असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

१३ डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता ‘सुवर्ण युगाच्या स्वप्नांसाठी’ या विषयावर माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन व १४ डिसेंबरला सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे ‘विद्यमान सरकार समोरील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. १५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन होणार आहे. १६ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरणाचे अध्यक्ष माधव भांडारी यांचे ‘धर्मनिरपेक्षता’ विषयावर व्याख्यान होणार आहे. १७ डिसेंबरला सकाळी ७ वाजता मोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येईल.

चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा ‘श्री मोरया जीवन गौरव’ पुरस्कार शांतिनाथ महाराज यांना हा जाहीर झाला आहे. शांतिनाथ महाराज ज्ञानेश्‍वरी, भगवद्‌गीतेचे अभ्यासक आहेत. त्यांनी नाथसंप्रदयाची दीक्षा घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moraya gosavi samadhi mahotsav from saturday