महासाधूंचा आजपासून समाधी महोत्सव सोहळा

चिंचवड : देऊळमळा पटांगणावर सुरू होणाऱ्या मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवानिमित्त उभारण्यात आलेला सभामंडप.
चिंचवड : देऊळमळा पटांगणावर सुरू होणाऱ्या मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवानिमित्त उभारण्यात आलेला सभामंडप.

पिंपरी - चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे शनिवारी (ता. ७) उद्‌घाटन होणार आहे. महोत्सवासाठी सभामंडप उभारणे, पोलिस बंदोबस्त, प्रसाद वाटप आदी सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 

या महोत्सवासाठी समाधी मंदिराजवळ सुमारे दीडशे फूट लांब आणि नव्वद फूट रुंद सभामंडप उभारण्याचे काम झाले आहे. सुमारे पंधरा फूट लांब आणि दहा फूट रुंद असे व्यासपीठ उभारले आहे. ‘श्रीं’च्या पूजेची जबाबदारी वेदमूर्ती चंद्रशेखर रबडे आणि अण्णा मुणगेकर यांच्याकडे आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी तीन वाहतूक पोलिस नेमण्यात आले आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळील जागेत भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मोरया गोसावी समाधी मंदिराकडे जाणारा रस्ता शुक्रवारपासून  (ता. १३) वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मंगलमूर्ती वाड्यात दोन हत्यारबंद पोलिस असतील. समाधी मंदिराच्या परिसरातही सहा ते दहा पोलिस कार्यरत असणार आहेत. ‘यू-ट्यूब’वर मोरया गोसावी यांचे पेज सुरू करण्यात आले आहे. त्याला भाविकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. महोत्सवासाठी देवस्थानच्या सर्व विभागाचे कर्मचारी सतत कार्यरत राहणार आहेत. त्यांच्या मदतीसाठी चिंचवडगावातील काही स्वयंसेवक आणि सासवडहून दहा स्वयंसेवक येणार आहेत.
 
छोट्या कंटेनरद्वारे प्रसाद वाटप
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी (ता. १७) दरवर्षीप्रमाणे यंदाही छोट्या कंटेनरमधून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. मंगलमूर्ती वाडा किंवा मोरया गोसावी समाधी मंदिराजवळ शिधा स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रवा, डाळ, गूळ, तूप, साखर, तेल या वस्तूंचा शिधा स्वीकारण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com