
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी मध्यमवर्गियांमध्ये जरी आरोग्य विम्याबाबत जागृती वाढत असली. तरी ग्रामीण भागात अजूनही आरोग्य विम्याचे महत्त्व आणि त्याच्याशी निगडित आरोग्य सुविधांबाबत जागृतीचा अभाव आहे.
पुणे : आरोग्य विम्याबाबत ग्रामीण भागात अजूनही अनभिज्ञता आहे. देशातील 60 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येला याबद्दल पुरेशी कल्पनाच नसल्याचे चित्र विविध संशोधनातून पुढे आले आहे. प्रा. सुषमा साठे यांचे राजगुरुनगर (पुणे), प्रयास संस्थेचे राजस्थान आणि डॉ. हेम्पील डिजिटल नेटवर्कचे देशभरातील सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी मध्यमवर्गियांमध्ये जरी आरोग्य विम्याबाबत जागृती वाढत असली. तरी ग्रामीण भागात अजूनही आरोग्य विम्याचे महत्त्व आणि त्याच्याशी निगडित आरोग्य सुविधांबाबत जागृतीचा अभाव आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थी असलेल्या प्रा. साठे सांगतात,"ग्रामीण भागात आरोग्य विम्यासंबंधी काय स्थिती आहे, याचा आढावा घेण्यासाठी राजगुरुनगरची निवड केली. तुलनेने शहराजवळ असलेल्या या भागातही आरोग्य विम्याबद्दल लोक अनभिज्ञ आहेत. काहींना त्याची कल्पना आहे परंतु, जोपर्यंत घरात मोठे आरोग्याशी निगडित संकट येत नाही. तोपर्यंत विम्याला प्राधान्य दिले जात नाही.'' कोरोनाच्या आधी हे संशोधन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि आयुष्यमान भारत आदी आरोग्य आणि अपघातांशी निगडित विमा योजनांच्या वापराबद्दल ग्रामीण भारतात अजूनही पुरेशी जागरूकता नसल्याचे दिसत आहे.
संशोधनाचे निष्कर्ष आणि उपाययोजना
- मोठा अपघात किंवा वैद्यकीय संकट आल्यावरच आरोग्य विम्याचा विचार होतो
- ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात अधिक जागृकता
- आरोग्य विम्यासाठी लागणारी कागदपत्रे, सरकारी योजना, विम्याचा क्लेम, त्याचा परतावा कसा मिळतो आदींबद्दल नागरिक अनभिज्ञ
- विमा नुतनिकरणाकडे दुर्लक्ष
- आरोग्य सुविधा, मोठी रुग्णालये दूर अंतरावर असल्यामुळे विमा घेण्यास टाळाटाळ
- आरोग्य विम्यापेक्षा पारंपारिक म्युचअल फंड, एफडी, आदी ठिकाणी लोक पैसे गुंतवतात, कारण तेथे परतावा मिळतो
या उपाययोजना आवश्यक
- आरोग्य विम्याबद्दल डॉक्टर, प्रशासकीय यंत्रणा आणि सरकारच्या माध्यमातून अधिक जनजागृती करणे गरजेचे
- विम्याचा फायदा नागरिकांना मिळतो का, याचा पडताळा घेणे आवश्यक
- आरोग्य विमा धारकाला काही परतावा, प्राथमिक आजारांची औषधे आणि आरोग्य सेवांमध्ये सूट मिळण्याची व्यवस्था आवश्यक
सावधान! Redmi Mi7 प्रो स्वस्तात घेण्याचा फंडा पडला महागात; सायबर चोरट्यांनी गंडवलं
देशातील मोठ्या ब्रॅंडच्या मधामध्ये चिनी साखरेची भेसळ?
1) सर्वेक्षणात सहभागी नागरिकांकडे आरोग्य विम्याची स्थिती ः
2) आरोग्य विमा न घेण्याची कारणे ः
बाईकची हौस नडली; बनावट कागदपत्रासह दुसऱ्याच्या नावे कर्ज घेणं पडलं महागात
तुलनेने प्रगत देशांमध्ये आरोग्य विमा योजना अधिक सक्षम आहेत. आरोग्य विम्याबाबत देशातील ग्रामीण भागात अधिक जनजागृती करायला हवीच. त्याचबरोबर विमाधारकाला विविध सेवा आणि सुविधा मिळायला हव्यात.
- प्रा. सुषमा साठे, संशोधक
चर्चा तर होणारच! कार्यक्रमापेक्षा आमदारांच्या पेहरावाचीच तालुक्यात चर्चा