कोरोनामुळे पुणे शहरात गर्भवतींचे मृत्यू अधिक

मातामृत्यू हा सार्वजनिक आरोग्याचा एक संवेदनशील निकष आहे. कोरोनाचा आरोग्याच्या सर्वच निकषांवर सर्वदूर परिणाम झाला.
Pregnant women
Pregnant womensakal
Summary

मातामृत्यू हा सार्वजनिक आरोग्याचा एक संवेदनशील निकष आहे. कोरोनाचा आरोग्याच्या सर्वच निकषांवर सर्वदूर परिणाम झाला.

पुणे - शहरात प्रसूतीनंतर (Delivery) अवघ्या काही वेळेत नव्याने आई (Mother) झालेल्या महिलेला मृत्यू (Women Death) झाला. त्याला कोरोना (Corona) हे महत्त्वाचे कारण (Important Reason) ठरले. गेल्या वर्षी जानेवारीपासून ते या वर्षी एप्रिलपर्यंत कोरोनामुळे ३१ टक्के मातामृत्यू नोंद महापालिकेत (Municipal) झाली. शहरात गेल्या दहा महिन्यांमध्ये ९६ मातामृत्यूची नोंद महापालिकेत झाली. त्यापैकी ८३ मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण केले. त्यातून ही धक्कादायक माहिती पुढे आली.

मातामृत्यू हा सार्वजनिक आरोग्याचा एक संवेदनशील निकष आहे. कोरोनाचा आरोग्याच्या सर्वच निकषांवर सर्वदूर परिणाम झाला. तसाच तो मातामृत्यूवर झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

शहरात एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ या झालेल्या ८३ मातामृत्यूपैकी ३१ टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू कोरोनामुळे झाले होते. तसेच १९ टक्के मातामृत्यूमागे अन्य वैद्यकीय कारणे होती. याशिवाय १३ टक्के मातामृत्यू स्पेप्सिसमुळे झाले असल्याचेही कारणांच्या विश्लेषणातून पुढे आले.

माता मृत्यू म्हणजे काय?

गर्भधारणा, प्रसूतीमध्ये किंवा प्रसूतीनंतर ४२ दिवसांमध्ये गर्भधारणेशी संबंधित कारणांमुळे झालेल्या मृत्यूला माता मृत्यू म्हटले जाते.

उपचारांना मर्यादा

  • गर्भवतींमध्ये संसर्गाचे प्रमाण इतर कोणत्याही व्यक्तींपेक्षा जास्त नाही. मात्र, उपचार वेगळे आहेत.

  • इतर रुग्णाप्रमाणे कोरोनाची औषधे देता येत नाहीत.

  • कोरोना प्रतिबंधक लशींनाही मर्यादा पडते.

डेल्टा ठरला प्राणघातक

शहरात गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली. ही कोरोनाची दुसरी लाट ठरली. यात कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरियंटचे प्रमाण सर्वाधिक हे. यात सर्वाधिक मातामृत्यू नोंदवले गेले. खासगी रुग्णालयांबरोबरच आणि सार्वजनिक रुग्णालयांमधूनही मातामृत्यूची नोंद झाली आहे. एकूण मातामृत्यूपैकी ४२ रुग्ण हे पुणे शहरातील होते. २७ रुग्ण शहराबाहेरील परंतु जिल्ह्याच्या हद्दीतून उपचारांसाठी पुण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com