होर्डिंगमुळे मोशीचे विद्रुपीकरण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

मोशी - मोशी टोल नाका ते भोसरी दरम्यानच्या पुणे-नाशिक महामार्गावर होर्डिंग उभारले आहेत. यावरील फाटलेल्या बॅनर्सचे कपडे हवेत लोंबकळणे, त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होणे, बॅनर्सचे फाटके कापड रस्त्यावरच पडल्याने पादचाऱ्यांना त्रास होत आहे. या होर्डिंगमळे मोशीच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग्ज पडले होते. दोन जणांचा बळी गेला होता. मोशी उपनगर हे शहराचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे मोशी ते नाशिक फाटा या दरम्यानच्या टोल नाका, भारत माता, मोशी, उपबाजार, राजा शिवछत्रपती, भोसरी, नाशिक फाटा आदी चौकांसह महामार्गावर जाहिरातींचे होर्डिंग्ज उभारले आहेत. हे होर्डिंग्ज तातडीने हटवावेत, अशी मागणी होत आहे. 

मोठ्या होर्डिंगमुळे शहराचे सौंदर्य नष्ट झाले आहे. प्रशासनाने आकाराचे बंधन घालून हॉकर्स झोनसारखा एक झोन निर्माण करावा. तेथेच होर्डिंग उभारण्यास परवानगी द्यावी. 
सुनील बोराटे, सामाजिक कार्यकर्ते 

वारकऱ्यांना देहू आणि आळंदीसाठी मोशीतूनच जावे लागते. मात्र, होर्डिंगमुळे तीर्थक्षेत्रांकडे जाणारे दिशादर्शक फलकही दिसत नाहीत. या दोन्ही तीर्थक्षेत्र मार्गावर कमानी उभाराव्यात. 
सोपान घोलप, सामाजिक कार्यकर्ते. 

Web Title: moshi hoarding issue