मोशी कचरा डेपो आगीमुळे नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

मोशी - गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोशी कचरा डेपोला लागलेली आग विझविण्यात आली असली, तरी गेल्या तीन दिवसांपासून हा कचरा डेपो प्रचंड धुराने धुमसत आहे. काही ठिकाणी अद्यापही किरकोळ आग लागलेलीच असून तिच्यावर माती टाकून विझविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र पेटलेल्या ठिकाणावर जरी माती टाकली जात असली तरी त्यामधून प्रचंड प्रमाणावर धूर धुमसत असल्याने धुरामुळे स्थानिक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

एकूण ८१ एकरमध्ये कचरा डेपो.
नवीन ठिकाणी संकलित केलेल्या प्लॅस्टिकयुक्त कचऱ्याला आग.
कायमस्वरूपी आग बंद व्हावी म्हणून सातशे ते आठशे ट्रक माती टाकली आहे.
अद्यापही माती टाकण्याचे काम सुरू.
आग विझविल्यानंतरही आत्तापर्यंत ३० ते ४० टॅंकर पाणी मारण्यात आले आहे.
पुढील चार ते पाच दिवस धूर निघत राहणार.

नागरिकांच्या प्रतिक्रिया...
कचरा डेपोच्या दुर्गंधीच्या त्रासाने अगोदरच स्थानिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यातच परवा लागलेल्या आगीतून निघणाऱ्या धुरामुळे भरच पडली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लागलेली ही आग माती टाकून आटोक्‍यात आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असला तरी आग लागूच नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.
- चंद्रकांत तापकीर, अध्यक्ष, आदर्शनगर, तापकीरनगर विकास कृती समिती.

गेल्या दोन दिवसांपासून निघत असलेल्या धुरामुळे श्‍वसनास त्रास होत आहे. घशामध्ये खवखव करण्याबरोबरच नाकामध्येही जळजळ होत आहे.
- गणेश आंबेकर, नागरिक 

कचरा डेपोला लागलेली आग पूर्णपणे विझविण्यात आली आहे. तरीही आतमधून धुमसत असलेली आग पूर्णपणे बंद होण्यासाठी वरून मातीचे थर टाकणे सुरू असून त्यावर पाणी मारण्याचे काम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत वीस टॅंकर पाणी मारले आहे. अजूनही दोन ते तीन दिवस धूर येत राहणार आहे. मात्र पुन्हा आग लागण्याचा धोका नष्ट झाला आहे.
किरण गावडे, मुख्य अग्निशामक अधिकारी

कचरा डेपोला लागलेली आग आटोक्‍यात आली असून ती पुन्हा लागू नये म्हणून त्यावर आत्तापर्यंत आठशेहून अधिक ट्रक माती टाकली असून यापुढेही हे काम सुरूच राहणार आहे. आग पुन्हा लागू नये त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे.
संजय कुलकर्णी, अभियंता, महापालिका  

Web Title: moshi news Citizen stricken with Moshi Trash depot fire