बहुतेक "एटीएम' केंद्रे बंदच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

पुणे - ""एटीएमला गेलो होतो; पण पैसे मिळाले नाहीत. आता पैसे शिल्लक नाहीत. यावर काहीतरी तोडगा काढायला हवा. लवकरात लवकर शहरातील एटीएम केंद्रे सुरू करावीत. नाहीतर खूप अडचणी येतील,'' अशी व्यथा गौरव चौधरी यांनी "सकाळ'कडे मांडली. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने सर्वसामान्यांची तारांबळ उडाली आहे. सलग तिसऱ्या दिवशीही शहरातील बहुसंख्य बॅंकांचे एटीएम केंद्रे रोख रक्कम नसल्यामुळे बंद होते. याचा फटका नागरिकांना बसला. त्यात चालू असलेल्या काही एटीएममध्ये नागरिकांनी गर्दी केली. काही लोकांमध्ये एटीएम केंद्रे बंद आहेत की चालू, याविषयी संभ्रमात असल्याने काहींना नाहक त्रास झाला. 

शहरातील बहुतांश एटीएम केंद्रे शुक्रवारी बंद होती, तर काही बॅंकांची केंद्रे सुरू झाल्यामुळे तिथे नागरिकांच्या रांगच्या रांगा लागल्या होत्या. बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बॅंक, कॉसमॉस बॅंकांच्या बहुतांश एटीएम केंद्रांवर नागरिकांना कॅश उपलब्ध झाली. पण, एचडीएफसी, आयसीआयसीआय, स्टेट बॅंक ऑफ इंडिया आदी बॅंकांची एटीएम केंद्रे बंद असल्यामुळे लोकांना निराश होऊन घरी परतावे लागले. सरकारने दोन दिवसानंतर एटीएम केंद्रांवर रोख रक्कम उपलब्ध होईल, अशी घोषणा केली होती; पण दोन दिवस वाट बघितल्यानंतर तिसऱ्या दिवशीही लोकांच्या पदरी निराशाच पडली. 

सकाळपासूनच एटीएम केंद्रावर रोख रक्कमेसाठी लोकांची रांग लागली होती. पण, बहुतांश एटीएम केंद्रे बंद असल्यामुळे लोकांच्या अपेक्षा फोल ठरल्या. स्वारगेट, विश्रांतवाडी, कॅम्प, धनकवडी आदी ठिकाणच्या एटीएम केंद्रावर दुपारपर्यंत लोकांना रोख रक्कम मिळत होती. त्यात काही ठिकाणच्या केंद्रात गर्दी असल्यामुळे रोख रक्कम संपली. पण, लोकांची गरज ओळखून बॅंकांनी तातडीने रोख रक्कम उपलब्ध करून दिली. 

शहरातील काही ठिकाणच्या केंद्रांची पाहणी केल्यानंतर "आउट ऑफ सर्व्हिस', "टेम्पररी नॉट अव्हेलेबल', "कॅश इज नॉट अव्हेलेबल' असे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे एटीएम केंद्रावर कार्ड स्वॉइप करूनही लोकांना रोख रक्कमेपासून मुकावे लागले. एटीएम केंद्रे सुरू आहेत, की नाही याविषयी काही लोकांमध्ये संभ्रम होता. 

लोकांची गरज ओळखून एटीएम केंद्रांवर रोख रक्कम उपलब्ध करून दिल्याचे सांगताना "कॉसमॉस बॅंके'चे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत पोंक्षे म्हणाले, ""पुण्यातील सर्व एटीएम केंद्रावर नागरिकांसाठी रोख रक्कम उपलब्ध करून दिली आहे. शहरातील आमच्या एकूण 35 केंद्रांवर कॅश उपलब्ध असून, लोकांना शंभरच्या नोटा देण्यात येत आहेत.'' 

सुमीत गायकवाड म्हणाले, ""एटीएम केंद्रावर गेलो तरी रोख रक्कम मिळाली नाही. बहुतांश केंद्रे बंदच होती. आता पैसे कुठून आणायचे हा प्रश्‍न पडला आहे. केंद्रे लवकर सुरू करावीत.'' 

Web Title: Most of the ATM centers closed

टॅग्स